गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आणखी एक हनीट्रॅप उघड; 17 वर्षांच्या मुलीने व्यापाऱ्याला लुटलं

कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यांच्याकडून सव्वातीन कोटींची खंडणी उकळल्याचा प्रकार ताजा असतानाच आज आणखीन एक अशीच घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने कोल्हापुरातील तरुण कापड व्यापाऱ्याला अडकवून सुमारे अडीच लाखाला गंडा घातला आहे.

हा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीला आला आहे.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सागर माने (वय 32, रा. कळंबा. ता. करवीर), सोहेल ऊर्फ अरबाज मुनाफ वाटंगी (23, रा. जुना वाशी नाका), उमेश साळुंखे (23, रा. राजारामपुरी), आकाश माळी (30, रा. यादवनगर), लुकमान सोलापूरे (27, जवाहरनगर) आणि सौरभ चांदणे (23, यादवनगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत.

या युवतीने संबंधित व्यापाऱ्यास त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरुन संबंधित व्यापाऱ्याने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र नातेवाईक आणि पोलिसांच्या सर्तकेतेमुळे तरूणाचा जीव वाचला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती परिसरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी राजवाडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन तरुणीसह साखळीतील संशयित विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हनीट्रॅपचा हा प्रकार उघडकीस येताच शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *