ताज्याघडामोडी

महिंद्रा अँड महिंद्रा बरोबर पंढरपूर सिंहगडचा सामंजस्य करार

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने नुकताच महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा बरोबर सामंजस्य करार झाला असून विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट वाढविण्याच्या दृष्टीकोनातुन ३६ तासांचे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली. गेल्या अनेक वर्षापासून अभियांत्रिकीच्या शिक्षण क्षेत्रात […]

ताज्याघडामोडी

नगराध्यक्षपदांचे आरक्षण काढण्यासाठी नगरविकास विभागाच्या हालचाली सुरू

राज्यात होऊ घातलेल्या 200 पेक्षा जास्त नगरपालिका व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण काढण्यासाठी नगरविकास विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी नगरपालिकांकडून माहिती मागविण्यात आली आहे.नगरविकास विभागाचे अपर सचिव विनय सहस्रबुद्धे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्यानंतर नगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत राज्यातील नवनिर्मित आणि मुदत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जिवंत असतानाही आत्याला मयत दाखवत जमीन परस्पर विकली, चौघांवर गुन्हा दाखल

पुण्याच्या लोणीकंद परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस. 77 वर्षीय आत्या जिवंत असतानाही ती 1983 सालीच मयत झाल्याचे दाखवून कोर्टात मृत्यूचा दाखला दाखल केला. त्याआधारे सातबारा व फेरफारला वारस म्हणून नोंद करून फिर्यादीची वडीलोपार्जित जमीन परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सखुबाई गेनबा ओव्हाळ (वय 77) यांनी तक्रार दिल्यानंतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात. विनोद […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्यध्यापकासोबत वाद,शिक्षिकेने शाळेतच केले विषप्राशन

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिकेत अनेक महिन्यापासून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्याने शनिवारी शिक्षिका संगीता राठोड यांनी भर शाळेतच दुपारी बारा वाजता विष प्राशन केले. सदर शिक्षिकेवर माजलगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,या घटनेने खळबळ उडाली आहे. राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘ओमायक्रॉन’ आता सर्वांना मारून टाकेल म्हणत डॉक्टरने पत्नी अन् मुलांची केली हत्या, सुसाईट नोटमध्ये केले खुलासे

करोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटने डोके वर काढले असून सर्वांनाच या व्हेरियंटने चिंतेत टाकले आहे. करोनाची धास्ती घेऊन याआधी अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशी परिस्थिती असताना ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे. या नवीन व्हेरियंटीची धास्ती घेऊन एका डॉक्टर ने पत्नी आणि मुलाची हत्या करत स्वत: दहा पानी सुसाईड नोट लिहत आत्महत्या केली आहे.कानपूर येथील इंद्रनगर […]

ताज्याघडामोडी

एटीएम मधून पैसे काढणं महागलं,१ जानेवारी पासून नवे दर लागू!

नव्या वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे. ज्यामुळं आता महागाईसोबतच हा नवा खर्चही सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. जानेवारी महिन्याच्या 1 तारखेपासून ग्राहकांना या बदलाला सामोरं जावं लागणार आहे.  फ्री एटीएम ट्रांजॅक्शन लिमीट ओलांडल्यानंतर सध्याच्या तुलनेत ग्राहकांना आणखी शुल्क भरावं लागणार आहे. जून महिन्यात आरबीआयनं यासाठीची परवानगी दिली होती.  काही दिवसांपूर्वीच आयसीआयसीआय […]

ताज्याघडामोडी

‘ओमिक्रॉन’वर लस किती प्रभावी… तिसरी लाट येणार का? केंद्राने केले शंकांचे निरसन

करोना व्हायरसच्या ‘ओमिक्रॉन’ वेरियंटविरुद्ध सध्या दिली जात असलेली कुठलीही लस काम करत नसल्याचा कोणताही पुरावा नाही. पण वेरिटंमध्ये झालेल्या म्युटेशनमुळे (बदल) लसीचा प्रभाव कमी होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नवीन वेरियंटमुळे (ओमिक्रटन) करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर करोना व्हायरसच्या ओमिक्रॉन वेरियंटबाबत वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याने केले विष प्राशन

कामाचा अतिरीक्त ताण असह्य झाल्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एरंडोल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या कर्मचाऱ्याने २३ नोव्हेंबर रोजी एरंडोल येथे विष प्राशन केलं होतं. उपचार सुरू असताना आज शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. संजय नामदेव पाटील (वय ५२, रा. चाळीसगाव) असं मृत कर्मचाऱ्याचं नाव […]

ताज्याघडामोडी

संपकरी ST कर्मचाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करणार- अनिल परब

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतरही विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन संप सुरुच ठेवला आहे. आता राज्य सरकारने कर्मचाऱ्यांविरोधात सौम्य धोरण अवलंबले होते. परंतु महाराष्ट्रातील जनतेचा विचार करुन आता कर्मचाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई कऱण्यात येणार आहे. तसेच संपाविरोधात मेस्मासंदर्भात कायदा लागू करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार […]

ताज्याघडामोडी

वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल तर भरावा लागणार ‘एवढा’ दंड; नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची होणार अंमलबजावणी

राज्यात यापुढे वाहतुकीचे नियम मोडणे तुम्हाला महागात पडणार आहे. कारण सरकारने नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतुद या नवीन कायद्याची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यासंबंधी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. केंद्राच्या या नव्या कायद्यानुसार […]