गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘ओमायक्रॉन’ आता सर्वांना मारून टाकेल म्हणत डॉक्टरने पत्नी अन् मुलांची केली हत्या, सुसाईट नोटमध्ये केले खुलासे

करोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटने डोके वर काढले असून सर्वांनाच या व्हेरियंटने चिंतेत टाकले आहे. करोनाची धास्ती घेऊन याआधी अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

अशी परिस्थिती असताना ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे. या नवीन व्हेरियंटीची धास्ती घेऊन एका डॉक्टर ने पत्नी आणि मुलाची हत्या करत स्वत: दहा पानी सुसाईड नोट लिहत आत्महत्या केली आहे.कानपूर येथील इंद्रनगर येथील डिव्हिनिटी होम्स अपार्टमेंटमध्ये डॉक्टरने हतोड्याने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. हा व्यक्ती नैराश्याचा बळी असल्याचे सांगितले जात आहे.

सुशील कुमार सिंह असे या डॉक्टरचे नाव असून रामा मेडिरल कॉलेजमध्ये डॉक्टर पदावर ते होते. पत्नी चंद्रप्रभा (50), मुलगा शिखर (20) मुलगी खुशी (16) अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या हत्येचे वृत्त समजताच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, डॉ. सुशील कुमार त्यांची पत्नी चंद्रप्रभासोबत डिव्हिनिटी होम्स अपार्टमेंटमध्ये राहत होते. ते रामा मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख होते. मुलगा शिखर आणि मुलगी खुशी हे देखील त्याच्यांसोबत त्याच अपार्टमेंटमध्ये राहत होते. शुक्रवारी सायंकाळी 5.32 वाजता डॉ. सुशील यांनी त्यांचा भाऊ सुनीलला मेसेज केला. त्यामध्ये त्यांनी पोलिसांंनी कळवण्याचे सुनील यास सांगितले.

हा मेसेज वाचून सुनील अपार्टमेंटमध्ये पोहोचला. दरवाजा आतून बंद आढळून आला. सुनिलने दरवाजा तोडला. आत गेल्यावर त्याला चंद्रप्रभा, शिखर आणि खुशी यांचे मृतदेह आढळून आले. यादरम्यान पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. पोलीसांना तपासादरम्यान घटनास्थळी एका डायरीतील एक चिठ्ठीही सापडली आहे. ज्यामध्ये डॉ. सुशील यांनी कुटुंबाच्या हत्येसह त्यांच्या आयुष्यातील गोष्टी लिहिल्या.

घटनास्थळावर 10 पानी सुसाईड नोट पोलीसांना मिळाले आहे. त्यात लिहीले आहे की, आता ओमायक्रॉन करोना आता सर्वांना मारून टाकेल. ओमायक्रॉन कोणालाही सोडणार नाही, यापुढे मृतदेह मोजले जाणार नाहीत. माझ्या हलगर्जीपणामुळे सध्या अशा अडचणीत अडकलो आहे, ज्यातून बाहेर पडणे अशक्य आहे.अखेर मी पूर्ण विचार करून माझं कुटुंब संपवत आहे आणि स्वतःलाही संपवत आहे. याला इतर कोणीही जबाबदार नाही.

गंभीर आजाराने ग्रासलं आहे. पुढे काहीच भविष्य दिसत नाहीये. शेवटी याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नाही. मी माझ्या कुटुंबीयांना या त्रासात सोडून जाऊ शकत नाही. सर्वांना मुक्तीच्या मार्गावर सोडत आहे. सगळा त्रास एकाच क्षणात संपवत आहे. माझ्यानंतर मी कोणालाही त्रासात पाहू शकत नाही. अन्यथा माझा आत्मा मला कधीच माफ करणार नाही. अलविदा…डोळ्यांच्या गंभीर आजारामुळे हे पाऊल उचलत आहे. शिकवणं हे माझं काम आहे. आता डोळेच राहिले नाहीत तर मी काय करू असे सुसाईड नोटमध्ये डॉ. सुशील यांनी लिहले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *