ताज्याघडामोडी

‘ओमिक्रॉन’वर लस किती प्रभावी… तिसरी लाट येणार का? केंद्राने केले शंकांचे निरसन

करोना व्हायरसच्या ‘ओमिक्रॉन’ वेरियंटविरुद्ध सध्या दिली जात असलेली कुठलीही लस काम करत नसल्याचा कोणताही पुरावा नाही. पण वेरिटंमध्ये झालेल्या म्युटेशनमुळे (बदल) लसीचा प्रभाव कमी होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

नवीन वेरियंटमुळे (ओमिक्रटन) करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर करोना व्हायरसच्या ओमिक्रॉन वेरियंटबाबत वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची यादी जारी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ओमिक्रॉनला ‘वेरियंट ऑफ कन्सर्न’ असे घोषित केले आहे.

लसीकरण महत्त्वाचं

कर्नाटकात ‘ओमिक्रॉन’चे दोन वेरियंट आढळून आले. यामुळे ‘ओमिक्रॉन’बाबत नागरिकांबाबत भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात उपस्थित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सध्या दिल्या जात असलेल्या लसी ‘ओमिक्रॉन’ वेरियंटविरुद्ध प्रभावी ठरत नसल्याचा कोणताही पुरावा नाही. पण ‘ओमिक्रॉन’ च्या स्पाइक जीनमध्ये झालेले काही म्युटेशन (बदल) सध्याच्या लसींची परिणामकारकता कमी करू शकतात, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

लस अँटीबॉडीसोबतच सेल्युलर प्रतिकारशक्तीपासून संरक्षण प्रदान करतात. सध्याच्या लसी अजूनही आजार गंभीर होण्यापासून संरक्षण प्रदान करतात. यामुळे लसीकरण महत्वाचे आहे. एखादी व्यक्ती लस घेण्यास पात्र असेल आणि ती घेतली नसेल, तर त्यांनी ती लगेच घ्यावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

‘ओमिक्रॉन’चा संसर्ग शोधण्यासाठी जिनोमिक सिक्वेंसिंग आवश्यक

करोनाचा संसर्ग शोधण्यासाठी केल्या जात असलेल्या चाचण्यांमुळे ‘ओमिक्रॉन’चाही शोध घेता येईल? यावरही मंत्रालयाने उत्तर दिले. RT-PCR चाचणीचा उपयोग हा सामान्यतः करोना संसर्ग शोधण्यासाठी केला जातो. याच पद्धतीने व्हायरसमधील विविष्ट जिन्सचा छडा लावला जातो. पण ओमिक्रॉन वेरिंयटची खात्री करण्यासाठी जिनोमिक सिक्वेंसिंगची आवश्यक आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

वेरियंट ऑफ कन्सर्न

जागतिक आरोग्य संघटना (WHO) मूल्यांकनानंतर ओमिक्रॉनला वेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केले आहे. संसर्ग वाढत आहे की करोना महामारीविज्ञानात घातक बदल झाला आहे का हे WHO पाहते. सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि सामाजिक उपाययोजना किंवा उपलब्ध निदान किंवा लसी यांच्या परिणामकारकतेत घट झाली आहे की नाही हे देखील पाहिले जाते. म्युटेशन (बदल), प्रसार आणि पुनर्संसर्ग वाढल्यामुळे ओमिक्रॉनला वेरियंट ऑफ कन्सर्न (चिंताजनक प्रकार) घोषित केले गेले आहे, असे मंत्रालयाने सांगितले.

पूर्वीसारखीच खबरदारी घ्यावी

करोनाबाबत आधीपासून घेतलेल्या खबरदारीत कोणताही बदल झालेला नाही, यावर मंत्रालयाने भर दिला. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले पाहिजेत. लस घ्या. भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी योग्य मार्गदर्शक सूचना जारी करत आहे.

नवीन वेरियंट समोर येणे हे सामान्य आहे आणि जोपर्यंत व्हायरसचा संसर्ग राहील आणि पसरत राहतील तोपर्यंत असेच घडत राहील. तसेच, व्हायरसचे सर्व प्रकार धोकादायक नसतात आणि आपण अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, अशी माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *