गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्यध्यापकासोबत वाद,शिक्षिकेने शाळेतच केले विषप्राशन

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिकेत अनेक महिन्यापासून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्याने शनिवारी शिक्षिका संगीता राठोड यांनी भर शाळेतच दुपारी बारा वाजता विष प्राशन केले.

सदर शिक्षिकेवर माजलगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,या घटनेने खळबळ उडाली आहे.

राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड आणि सहशिक्षीका संगीता राठोड यांच्यात मागील अनेक महिन्यांपासून वाद आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावानंतर दीड वर्षानंतर शाळा उघडल्याने त्यांच्यातील हा वाद चव्हाट्यावर आला .

शाळेतच मुलांसमोर दोघांतील अंतर्गत वाद होऊ लागल्याने याची कुणकुण गावातील पालक , ग्रामपंचायतीचे पदाधिकारी , ग्रामस्थांना लागली . त्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने दोघांचा वाद मिटवण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पालकांनी शाळा बंद ठेवली होती. तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला .

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोघांची सोमवार दि.6 रोजी सुनावणी ठेवली होती . त्याअगोदरच संगीता राठोड या शनिवारी सकाळी राजेवाडी येथे शाळेत गेल्या होत्या. तिथे त्यांनी 12 वाजण्याच्या दरम्यान विष घेतले . यामुळे शाळेतील शिक्षक घाबरून गेले . त्यांनी तात्काळ संगीता राठोड यांना माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *