ताज्याघडामोडी

सावधान ओमिक्रॉन पसरतोय तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी उद्या महत्त्वाची बैठक घेणार आहेत. केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी करून राज्यांना सतर्क केले आहे. देशात Omicron च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आता मेदांता हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान यांनी पुढील ६ ते ८ आठवडे भारतीयांसाठी गंभीर असतील, असा इशारा दिला आहे. चिंता करणे आवश्यक आहे. ही चिंता काही आठवड्यांपूर्वीच […]

ताज्याघडामोडी

देशभरात पुन्हा रात्रीची संचारबंदी? ओमायक्रॉन च्या पार्श्वभूमीवर केंद्राचं राज्यांना पत्र

भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे  झपाट्याने वाढत आहेत. केरळपासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशातील 14 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये ओमायक्रॉनची 3 प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसारखी कठोर पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच केंद्राने राज्यांना वॉर रूम सक्रिय करण्यास सांगितलं आहे. केंद्रीय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

२३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक; जीएसटी विभागाची मोठी कारवाई

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राज्य कर अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही […]

ताज्याघडामोडी

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक: 15 मार्च – प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा) 16 मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा 19 मार्च – इंग्रजी 21 मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा) 22 मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय वा तृतीय भाषा) […]

ताज्याघडामोडी

भरती परीक्षांमध्ये घोटाळा झाला असल्यास, भरती रद्द करणार – अजित पवार

उद्यापासून राज्याच्या विधानभवनात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. हे हिवाळी अधिवेशन नागपुरात न होता, मुंबईतच होत आहे. मात्र पुढचे अधिवेशन नागपूरात घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषेदत दिलं आहे. ते पुढे म्हणाले, ‘यंदाच अधिवेशन नागपूरला व्हावे या मताचे हे सरकार होतं पण मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे आम्ही हे अधिवेशन मुंबईत घेतले असल्याचही पवार यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

संपत्ती हडपण्यासाठी आईलाच दाखवलं मयत; अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई

बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील पळसखेड याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने संपत्ती हडपण्यासाठी आपल्या सावत्र आईलाच मयत दाखवलं आहे. आरोपीनं आपल्या सावत्र आईला मयत दाखवून तिच्यावर नावावर असलेली शेतजमीन आपल्या नावावर करून घेतली आहे. पण त्याचा डाव फार काळ टिकला नाही. हे प्रकरण लक्षात येताच उपविभागीय अधिकारी गणेश राठोड याने लालची […]

ताज्याघडामोडी

4 दिवसांचा होणार आठवडा? 13 राज्य अंमलबजावणी करण्यासाठी तयार

केंद्र सरकार कामगार कायद्यांमध्ये नव्या वेतनासह काही बदल करण्याच्या तयारीत आहे. या कायद्याची नव्या वर्षात अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. चार कामगार कायदे आहेत ज्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम कर्मचारी वर्गावर होणार आहे.  सर्वात मोठा फायदा तर टेक होम सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होणार. तर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे PF मध्ये देखील […]

ताज्याघडामोडी

भाळवणी येथे DVP दि पिपल्स मल्टीस्टेट शाखेचे उदघाटन मा.आमदार दिपक आबा सांळुखे यांच्या उपस्थित संपन्न

भाळवणी येथे DVP दि पिपल्स मल्टीस्टेट यानवीन शाखेचे उदघाटन सोलापूर जिल्ह्याचे मा.आमदार श्री.दीपक आबा साळुंखे-पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  उत्कृष्ट व पारदर्शक कारभारामुळे जनमानसात मल्टीस्टेटने विश्वासाचं नातं निर्माण केले आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर भाळवणी येथील देखील मल्टीस्टेट उच्चांक स्तरावर जाईल असा विश्वास अभिजीत पाटील यांनी व्यक्त […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला संपवलं, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत भिवंडीमधील एका व्यक्तीने मटण कापण्याच्या सुऱ्याने तिची हत्या केल्याची घटना घडला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वत:चं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, परिसरातील लोकांनी त्याचा जीव वाचवला अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. आनंद वाघमारे असे पत्नीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरातील आगरी धर्मशाळेतून भाविकांचे लाखोंचे सोने,रोख रक्कम व मोबाईल लंपास

पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा रस्त्यावर असलेल्या आगरी समाज धर्मशाळेत भाविकाच्या रूममधून नजर चुकवून चोरटयाने ५ तोळे वजनाचे सोन्याची चैन,२ अंगठ्या,रोख रक्कम रुपये ६० हजार तसेच ओप्पो कंपनीचे २ मोबाईल व किमती घड्याळ लंपास केले आहे या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार सचिन चिंतामन माळवी वय-36जात -आग्री कोळी,धंदा-लेबर काँन्ट्रँक्टर ,रा जांभुळपाडा पोस्ट भाताने ता वसई […]