गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरातील आगरी धर्मशाळेतून भाविकांचे लाखोंचे सोने,रोख रक्कम व मोबाईल लंपास

पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा रस्त्यावर असलेल्या आगरी समाज धर्मशाळेत भाविकाच्या रूममधून नजर चुकवून चोरटयाने ५ तोळे वजनाचे सोन्याची चैन,२ अंगठ्या,रोख रक्कम रुपये ६० हजार तसेच ओप्पो कंपनीचे २ मोबाईल व किमती घड्याळ लंपास केले आहे

या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार सचिन चिंतामन माळवी वय-36जात -आग्री कोळी,धंदा-लेबर काँन्ट्रँक्टर ,रा जांभुळपाडा पोस्ट भाताने ता वसई जिल्हा पालघर हे विठ्ठल दर्शनासाठी 19/12/2021रोजी कुटुंबासह देवदर्शनास आले होते.आग्रीधर्मशाळा पंढरपुर येथे रुम नं 228 येथे ते मुक्कामी राहिले.दि-20/12/2021 रोजी पहाटे 05/00वाचे सुमारास फिर्यादीची पत्नी सौ. सुनिता सचिन माळवी या चंद्रभागा नदी अंघोळीला नदीवर गेल्या होत्या.जाताना त्यांनी रूमचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवला होता.

अंघोळ करुन 05/30 वा परत आल्यानंतर रुममध्ये भिंतिच्या हँगरला आडकवलेली बँग नजरेस न पडल्याने त्यांनी फिर्यादीस झोपेतुन उठवले व आपली बँग भिंतीच्या हँगरला आडकवलेली दिसत नाही असे सांगितले.त्यांनी रुममध्ये बँगचा शोध घेतला असता बँग मिळुन न आल्याने त्यांची पुर्ण खात्री झाली.या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *