ताज्याघडामोडी

राज्यातील या भागात पुढचे 3-4 दिवस मुसळधार पाऊस

राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात थैमान घातले. यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मात्र पावसाने राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. यानंतर नद्या, नाले ओसांडून वाहत आहेत. पर्यटकही या पावसाचा आनंद घेत आहेत. यातच आता हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने काय म्हटलं – […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या प्रकल्पला “बेस्ट प्रकल्प” ॲवार्ड

इंजिनिअर्स डे निमित्त शिरूर (ता. पुणे) येथील एमआयडीसी मधील रांजणगाव इन्डस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “प्रोजेक्ट काॅम्प्युटिशन” स्पर्धेत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयाला “बेस्ट प्रकल्प ॲवार्ड” मिळाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.     १५ सप्टेंबर हा दिवस “इंजिनिअर्स डे” म्हणून सर्वञ साजरा करण्यात येत असतो. या दिवसाचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पाऊस आल्याने आडोशाला थांबलेल्या तरूणाला चोर समजून बेदम मारहाण; तरूणाचा मृत्यू

पाऊस आला म्हणून आडोशाला थांबलेल्या तरूणाला चोर समजून मारहाण करण्यात आली. या मारहाणी तरूणाची मृत्यू झाला आहे. संजय प्रभाकर पवार असे मृत्यू पावलेल्या आदिवासी तरूणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास घडली. पाऊस आल्यामुळे संजय आडोशाला थांबला होता. यावेळी चोर समजून त्याला नागरिकांनी लाठ्या, काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जन्मदात्या आईने 3 वर्षीय चिमुकलीला मारून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकलं

जन्मदात्या आईनेच तीन वर्षीय पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार येथे उघड झाली आहे . मागील दोन वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. आर्थिक कणकण भासू लागल्याने महिलेनं आपल्या साना सुलेमानी या तीन वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. […]

ताज्याघडामोडी

सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागाच्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, बदलीसाठी सावकारांकडून 84 लाख 50 हजारांचं कर्ज

सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात (घडली आहे. सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स या इमारतीमधील राहत्या घरी सोमवारी (19 सप्टेंबर) गळफास घेऊन आयुष्य संपवलं. गणेश शंकर शिंदे (वय 52 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. गणेश शिंदे यांनी सुसाईड नोटही लिहिलेली आहे, ज्यात सावकारांनी पैशांसाठी तगादा लावल्यामुळे आत्महत्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्राध्यापक पतीने पैशासाठी पत्नीला फासावर लटकवले; सुदैवाने दोरी तुटली अन्…

एका प्राध्यापकाने पैशासाठी चक्क आपल्या पत्नीला फासावर अडकविले.मात्र, दोरी तुटल्याने सुदैवाने ती बचावल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. १८) उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रा. मंगेश कुळमेथे (रा. बिरसा मुंडा नगर, राजुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्रा. मंगेश कुळमेथे याचे चार महिन्यांपूर्वी लग्न […]

ताज्याघडामोडी

झोमॅटो बॉयकडून तरुणीचा विनयभंग, जबरदस्तीने घेतले चुंबन

पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका नामांकित सोसायटीत जेवणाची डिलिव्हरी करण्यास आलेल्या झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेत, डिलिव्हरी बॉयने तिचे जबरदस्तीनं चुंबन घेतलं आहे. तरुणीने तत्काळ याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल […]

ताज्याघडामोडी

पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश

काही दिवसांपूर्वी पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत खाकी वर्दीतील पोलीस नाचल्यामुळे वादंग निर्माण झाला होता. पोलिसांची ही कृती योग्य होती किंवा नव्हती, यावरुन वादविवाद सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांना खाकी वर्दी घालून नाचण्यास मनाई करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगळ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत […]

ताज्याघडामोडी

शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी प्रा.शिवाजी सावंत यांची निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी बंडाचे निशाण फडकावत थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेत उद्धव ठाकरे हे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या हिंदू विरोधी विचारसरणीस बळ देत आहेत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या डुप्लिकेट विरोधात पुण्यात गुन्हा दाखल गैरसमज पसरवल्याचे कारण,गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल केल्याने कारवाई

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसणारे पुण्यातील विजय माने  यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास आप्पासाहेब जाधव यांनी बंडगार्डन पोलीस […]