ताज्याघडामोडी

सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागाच्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, बदलीसाठी सावकारांकडून 84 लाख 50 हजारांचं कर्ज

सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात (घडली आहे.

सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स या इमारतीमधील राहत्या घरी सोमवारी (19 सप्टेंबर) गळफास घेऊन आयुष्य संपवलं. गणेश शंकर शिंदे (वय 52 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. गणेश शिंदे यांनी सुसाईड नोटही लिहिलेली आहे, ज्यात सावकारांनी पैशांसाठी तगादा लावल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

मुंबईतून पुण्याला बदली पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी गणेश शंकर शिंदे यांनी सावकारांकडून 20 ते 25 टक्के व्याजदराने 84 लाख 50 हजार रुपये कर्ज घेतलं होतं. त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे दिले, त्यानंतर त्यांची बदली देखील झाली. परंतु सावकारांचं दिलेल्या कर्जाचे काही हफ्ते गणेश शिंदे यांनी थकवले.

सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी बँकेतून लोन घेण्याचीही तयारी केली होती. परंतु लोन करुन देणाऱ्या व्यक्तीने पैसे घेऊन ऐनवेळी लोन मंजूर करण्यास नकार दिला. यामुळे सावरकारांनी पैशांसाठी लावलेला तगादा आणि फसवणूक यामुळे कंटाळलेल्या सहकार विभागाचे लेखाधिकारी गणेश शिंदे यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *