इंजिनिअर्स डे निमित्त शिरूर (ता. पुणे) येथील एमआयडीसी मधील रांजणगाव इन्डस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “प्रोजेक्ट काॅम्प्युटिशन” स्पर्धेत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयाला “बेस्ट प्रकल्प ॲवार्ड” मिळाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
१५ सप्टेंबर हा दिवस “इंजिनिअर्स डे” म्हणून सर्वञ साजरा करण्यात येत असतो. या दिवसाचे औचित्य साधून शिरूर (ता. पुणे) येथील एमआयडीसी मधील रांजणगाव इन्डस्ट्रीज असोसिएशन यांनी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रकल्प सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेत विविध महाविद्यालयातुन ३५ हून अधिक प्रकल्प आले होते. ह्या मध्ये उत्कृष्ट ५ महाविद्यालयांचे प्रकल्प व ४ इंडस्ट्रीतील यांचे सादरीकरण झाले .यामधुन कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कुमार संदिप क्षिरसागर व काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेली कुमारी वैष्णवी माळी यांनी तयार केलेल्या प्रकल्प ला “बेस्ट ॲवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
“बेस्ट ॲवार्ड” मिळाल्याबद्दल काॅलेजचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी संदिप क्षिरसागर व वैष्णवी माळी यांचे अभिनंदन केले.