ताज्याघडामोडी

वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळणार बॉडीवार्न कॅमेरे

वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येतील, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.पोलीस जिमखाना येथे वाहतूक शाखेतील पोलिसांना या कॅमेऱ्यांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त […]

ताज्याघडामोडी

पुण्याकडून सोलापूरला जाणारी वाहतूक बंद

17 जानेवारी : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ एमआयडीसी जवळ केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. टँकर महामार्गावरून बाजूला करताना आग लागण्याची शक्यता असून पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सहा क्रेन आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. टँकरमध्ये ज्वलनशील केमिकल असण्याची शक्यता असल्याने पलटी झालेल्या टँकरला बाजूला करण्यासाठी खबरदारी म्हणून क्रेन […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

आठ टेबलवर नऊ फेऱ्यात होणार मतमोजणी

पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी 331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले असून.मतमोजणी सोमवार दि 18 जानेवारी 2021 रोजी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे सकाळी 8.00 वाजता होणार आहे. मतमोजणी 219 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 8 टेबलवर 9 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. याबाबत प्रशासनाने पुर्ण तयारी केली असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार […]

ताज्याघडामोडी

राज्याच्या आरोग्य विभागाने फेटाळले लसीकरण स्थगितीचे वृत्त

शनिवारपासून देशासह राज्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पण राज्यात दोन दिवसांसाठी लसीकरण अभियान स्थगित करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. १८ जानेवारीपर्यंत लसीकरण लस नोंदणीसाठीचे ‘को-विन’ अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, हे वृत्त राज्याच्या आरोग्य विभागाने फेटाळून लावले आहे. कोरोनावरील दोन प्रतिबंधात्मक लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर शनिवारपासून […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचात निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास प्रतिबंध

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर विजयी मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा करण्याचे धाडस कराल तर सावधान. कारण, विजयोत्सव मिरवणुका काढण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल उद्या (दि.१८ जानेवारी) जाहीर केला जाणार आहे. यापार्श्‍वभूमीवर […]

ताज्याघडामोडी

क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाच्या मृत्यू

सांगलीच्या आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने (Heart attack) एका तरुणाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अतुल विष्णू पाटील( वय 35) असं मयत तरुणांचे नाव आहे. मैदानात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी त्या आटपाडी येथे सुरू होत्या. तासगाव […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट; पोलिसाला १६ जणांकडून मारहाण

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागलंय, वसमत तालुक्यातील गुंज गावात जिल्हा परिषद शाळेवर मतदान सुरू असताना एका पोलिसाला मारहाण झाली आहे.  भाजपचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवहार नरवाडे आणि त्यांचे १५-१६  कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचारी गजानन पुरी यांनी त्यांना गर्दी टाळण्याच्या सूचना केल्या असता पुरी यांची कॉलर पकडून मारहाण झाली.  […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकाचे काम तात्काळ मार्गी लावा

मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकास मान्यता मिळालेली आहे. या कामासाठी यापूर्वीच्या  शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकालावधीमध्ये निधीची तरतूद झालेली आहे असे समजते. तथापि जागेअभावी अद्यापर्यंत कामास […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर युवा मुद्रक संस्थेतर्फे पत्रकार सुरक्षा समितीचे नुतन अध्यक्ष नुतन उपाध्यक्ष याचा सत्कार व मुद्रक संस्थेतर्फे तिळगुळ समारंभ

पंढरपूर युवा मुद्रक संस्थेतर्फे पत्रकार सुरक्षा समितीचे नुतन अध्यक्ष नुतन उपाध्यक्ष याचा सत्कार व मुद्रक संस्थेतर्फे तिळगुळ समारंभ पंढरपूर दि. 15 (प्रतिनिधी) – गेली नऊ वर्षे पंढरपूरात मुद्रकांसाठी कार्य करणारी एकमेव मुद्रक संस्था कार्यरत आहे.  मुद्रक संस्थेने अल्पावधीतच मुद्रकांचे संघटन व मुद्रकांच्या अनेक प्रश्नांचे निराकरण करुन आपला  नांवलौकिक मिळविला आहे. या संघटना बांधणीत संस्थेचे संस्थापक […]

ताज्याघडामोडी

दहावीचा अभ्यासक्रम निम्मा करावा या मागणीसाठी मुख्याध्यापक,शिक्षक संघटना आग्रही

कोरोना आणि लॉककडाऊन मुळे या वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर  दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळे  अभ्यासक्रम निम्म्याने कमी करावा अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.सध्या ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असल्याने दहावीचा 25 टक्के अभ्यासक्रम यापूर्वीच कमी करण्यात आला होता. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मे – जून महिन्यात होणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी जाहीर […]