आमदार फुटणार दोन ते तीन वेळा कानावर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. शरद पवार, जयंत पाटील यांनीही ही माहिती त्यांना दिली होती. मात्र, आपले सहकारी इतकी टोकाची भूमिका घेतील, असे त्यांना वाटले नव्हते,’ अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे […]
ताज्याघडामोडी
अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना दिला सल्ला; म्हणाले, “मला वाटतं त्यानं.”
गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव […]
सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक; तरूणाने स्टेटस ठेवून केली आत्महत्या, चुलत भावावर गुन्हा दाखल
सातारा : जिल्ह्यातील कराड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. सैन्य दलात भरती करण्याच्या अमिषाने फसवणूक केल्याचा वॉटस्अप स्टेटस ठेऊन तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कराड तालुक्यातील कोळे गावात घडली असून दयानंद बाबुराव काळे, असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सैन्य दलात जवान असलेला त्याचा […]
मराठा उमेदवारांना पुन्हा झटका; EWS मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा
सरकारी नोकर भरतीची वाट पाहणाऱ्या मराठा उमेदवारांना झटका देणारा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात ने दिला आहे. राज्य सरकारने मराठा उमेदवारांना ईडब्लूएसमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचे मॅटने म्हटले आहे. यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. मराठा उमेदवारांना ईडब्लूएसमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. काही खात्यांमधील सरकारी […]
मी पूर्ण जबाबदारीने सांगतेय… अदानी प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया
अदानी समूहाबाबतच्या कथित गैरव्यवहारांबाबतचा अहवाल अमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केल्याने गेल्या काही दिवसांपासून एकच खळबळ उडाली आहे. Hindenburg Research नं अदानी उद्योग समूहावर बाजारातील व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी उद्योग समूहाला एकूण 120 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. याचे पडसाद देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशतानही उमटले आहेत. संसदेत अदानी प्रकरणावरून मोठा गदारोळ […]
गर्लफ्रेण्ड दुसऱ्या पोराबरोबर दिसली, तरुणाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात सगळं संपवलं
मुंबईकर तरुणाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी १२ तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत फिरत असल्याच्या रागातून प्रियकराने साथीदाराच्या मदतीने १९ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. आरोपीने अनेक वार केल्यामुळे तरुणाला प्राण गमवावे लागले. मुंबईतील चेंबुर परिसरात ही घटना घडली होती. गर्लफ्रेण्ड दुसऱ्या मुलासोबत फिरत असल्याच्या रागातून बॉयफ्रेण्डने आपल्या साथीदाराच्या मदतीने त्याची हत्या […]
पगार नंतर ठरवा म्हणत विश्वास संपादन करणाऱ्याने ‘काम’ दाखवले, दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर झाला पसार
‘आधी माझं काम बघा, नंतर पगार ठरवा’ अशी भुरळ घालत सराफाचा विश्वास संपादन करून मुंबईहून आलेल्या दागिने बनविणाऱया कारागिराने पाचव्याच दिवशी दोन लाखांचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना घडली. हसन नूरमहंमद शेख (43, रा. बुधवार पेठ, सातारा) यांचे साताऱ्यातील बुधवार पेठेत एचएस गोल्डस्मिथ या नावाचे सोन्याचे दुकान आहे. मुंबईतील एका ओळखीच्या व्यक्तीने पाच दिवसांपूर्की हसन […]
दहावी बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर पाच वर्षे परीक्षेला मुकाल, फौजदारी गुन्हाही होणार दाखल
दहावी आणि बारावी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.यंदा दहावी बारावीच्या परीक्षेचे नियम कडक करण्यात आले आहेत. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. शिवाय […]
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीची विषप्राशन करीत आत्महत्या; कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल
पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. निलेश माझीरे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असून ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केलं होतं, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी दुर्दैवानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या का […]
“एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण आणि शिवसेनेवर दावा टाळायला हवा होता”, बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “लायकी नसल्याने.”
शिवसेनेत फूट पडल्याने राज्यातील जनतेत नकारात्मक वातावरण झालं आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही नकारात्मता मोडून काढतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले इथेपर्यंत ठिक होतं. मात्र, धनुष्यबाण आणि शिवसेनेवर एकनाथ शिंदेंनी दावा टाळायला पाहिजे होता. हे एकनाथ शिंदेंना बोलून दाखवलं होतं. परंतु, काहीपण झालं तरी सत्ता पाहिजे, हा राजकारणी लोकांचा धर्म आहे, […]