मुंबईकर तरुणाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी १२ तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत फिरत असल्याच्या रागातून प्रियकराने साथीदाराच्या मदतीने १९ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. आरोपीने अनेक वार केल्यामुळे तरुणाला प्राण गमवावे लागले. मुंबईतील चेंबुर परिसरात ही घटना घडली होती.
गर्लफ्रेण्ड दुसऱ्या मुलासोबत फिरत असल्याच्या रागातून बॉयफ्रेण्डने आपल्या साथीदाराच्या मदतीने त्याची हत्या केली. २१ वर्षीय मुद्देशीर या तरुणाची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना गुरुवारी चेंबूर परिसरात घडली होती.
याबाबत गुन्हे शाखा परिमंडळ सहाच्या अधिकाऱ्यांनी १२ तासात दोघांना बेड्या ठोकल्या. १९ वर्षीय आदित्य त्रिभुवन आणि २० वर्षीय खलफम सय्यद या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चेंबूर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीसोबत आदित्यचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून ही तरुणी मुद्देशीर याच्यासोबत फिरत होती. ही माहिती आदित्यला मिळतच त्याने मुद्देशिर शेखला गुरुवारी चेंबूरच्या सिंधी सोसायटी परिसरात गाठले.या ठिकाणी खलफम याच्या मदतीने त्याने मुद्देशीरवर अनेक वार केले. यामध्ये मुद्देशीरचा मृत्यू झाला. त्यानंतर कल्याण, कुर्ला या परिसरात तपास करत गुन्हे शाखेने धारावी परिसरातून दोघा जणांना अटक केली आहे.