ताज्याघडामोडी

पगार नंतर ठरवा म्हणत विश्वास संपादन करणाऱ्याने ‘काम’ दाखवले, दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर झाला पसार

‘आधी माझं काम बघा, नंतर पगार ठरवा’ अशी भुरळ घालत सराफाचा विश्वास संपादन करून मुंबईहून आलेल्या दागिने बनविणाऱया कारागिराने पाचव्याच दिवशी दोन लाखांचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना घडली.

हसन नूरमहंमद शेख (43, रा. बुधवार पेठ, सातारा) यांचे साताऱ्यातील बुधवार पेठेत एचएस गोल्डस्मिथ या नावाचे सोन्याचे दुकान आहे. मुंबईतील एका ओळखीच्या व्यक्तीने पाच दिवसांपूर्की हसन शेख यांना फोन करून तुमच्याकडे कामाला एक व्यक्ती पाठवत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोफीकूल शेख (32, रा. पश्चिम बंगाल) हा साताऱ्यात आला. हसन शेख यांच्या दुकानात तो गेला. ओळख झाल्यानंतर सोफीकुल याने ‘माझं आधी काम बघा, नंतर पगार ठरका’, असे सांगितले. त्यामुळे हसन यांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला.

पहिल्याच दिवशी सोफीकुल याने हसन यांचा विश्वास संपादन केला. पाचव्या दिवशी सकाळी तो लघुशंका करून येतो, असे सांगून निघून गेला तो परत आलाच नाही. हसन शेख यांनी त्याचा शोध घेतला असता, तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी दुकानात दागिने पाहिले असता दोन लाखांचे दागिने गायब असल्याचे शेख यांच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सोफीकुल शेख याच्याकर गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार साबळे हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *