ताज्याघडामोडी

अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना दिला सल्ला; म्हणाले, “मला वाटतं त्यानं.”

गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला. कॉंग्रेसने सुधीर तांबे यांच्यासह सत्यजीत तांबे यांना निलंबित केले आहे.

त्यामुळे सत्यजीत तांबे यांची भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागेलेलं आहे. यावर 4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. अशातच अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांना सल्ला दिला आहे.

इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. नाशिक पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करणार पण त्यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे हे त्यांनी पाहावं, त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचंय. या सगळ्याचा विचार करून त्यानं निर्णय घ्यावा, असा सल्ला अजित पवार  यांनी दिला. सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात आणि वडील सुधीर तांबे हे कॉंग्रेसच्या विचारांचे आहे, त्यामुळे सत्यजित तांबे हे थोरामोठ्याचे ऐकतील असं वाटतं असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *