ताज्याघडामोडी

मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषण करणार; राज्य सरकारचं टेन्शन वाढणार

मनोज जरांगे पाटील आजपासून (१० फेब्रुवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. मात्र, सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्याहून कराडला जाताना झोप लागली, उतरली मिरजेत; विवाहितेवर सामूहिक बलात्कार, कर्नाटकात विकले

एक झोपेची तरुणीला मोठी किंमत मोजावी लागली आहे. पुण्याहून कराडला आई वडिलांना भेटण्यासाठी निघालेल्या विवाहित तरुणीला रेल्वेत झोप लागली. तिला कराडला उतरायचं होतं, मात्र झोप लागल्यानं मिरजेला पोहोचली. लवकर गाडी नसल्याने ती रेल्वे जंगक्शनवर थांबली. त्यावेळी तिथे काही तरुणांनी तिला जबरस्तीने झुडपात ओढत नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीला रेल्वे ब्रीजजवळील कामगाराच्या एका […]

ताज्याघडामोडी

वाळू माफियांची मुजोरी, थेट जिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; डोक्यावर रॉडने जबर मारहाण

वाळूमाफियांनी उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवारी (दि.६) मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक एका संशयितास नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, […]

ताज्याघडामोडी

प्रेयसीसोबत बर्थडे पार्टी, जंगलात केक कापला, गिफ्टच्या बहाण्याने केलं भयानक कांड

देशात प्रेमप्रकरणांमधून हत्या झाल्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. केवळ आकर्षणापोटी, पैशांसाठी किंवा इतर काही कारणांवरून या हत्या घडतात. झारखंडची राजधानी रांचीमध्येही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली. 3 फेब्रुवारीला प्रियकरानं प्रेयसीसोबत निर्घृण कृत्य केलं. त्यानंतर पोलीस चौकशीत सत्य उघड झालं. रांचीमधल्या मांडर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एका जंगलात प्रियकरानं प्रेयसीचा खून केला आणि पुरावे नाहीसे […]

ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी कारखान्यावर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्त्यांचे जंगी मैदान

भाळवणी: सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय वसंतरावदादा काळे यांच्या 22 व्या पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी ( 9 फेब्रुवारी) दुपारी 2 नंतर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या […]

ताज्याघडामोडी

बहिणीबद्दल अपशब्द वापरल्याने वाद, बालपणीच्या जिवलग मित्राकडून मित्राची हत्या

बहिणीबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फरशी टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. नाशिकच्या अंबड परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हत्या करणाऱ्या संशयितास पोलिसांनी एका तासात अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या सिडको परिसरात कामाटवाडा परिसरात राहणारे आनंद इंगळे आणि […]

ताज्याघडामोडी

वाडीकुरोली येथे वसंतराव काळे यांच्या जयंतीनिमित्त वसंत फेस्टिवलचे आयोजन

श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सहकारी शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकुरोली येथे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत फेस्टिवलचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे यांनी दिली.  पंढरपूर तालुक्याच्या राजकीय पटलाबरोबरच शेती, सहकार ,शिक्षण, कला, क्रीडा या क्षेत्रात वसंत दादांनी केलेले कार्य आपल्या […]

ताज्याघडामोडी

शिक्षक भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध, 21 हजार पदांची बंपर भरती; मुलाखत न देताही मिळणार नोकरी

शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. तब्बल 21 हजार जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात शिक्षक विभागानं प्रसिद्ध केलीय. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपलीय.  राज्यातील शिक्षकांची भरती लवकरच होणार आहे. शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शालेय […]

ताज्याघडामोडी

लोकसभे बरोबरच विधानसभांच्या निवडणुका घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पाठींबा

देशात लोकसभा निवडणुकांच्या बरोबरच विधानसभा निवडणुकाही एकत्र घेतल्या जाव्यात आणि ‘एक देश एक निवडणूक’ प्रक्रियेला सुरुवात करावी अशा पद्धतीची चर्चा केंद्रात सुरू आहे. या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या कोविंद समितीने राजकीय पक्षांकडून अभिप्राय मागवले होते. त्यानुसार देशभरातील विविध पस्तीस राजकीय पक्षांनी यासंदर्भात आपला अभिप्राय सदर समितीला पाठवला आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गोविंद […]

ताज्याघडामोडी

‘…तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही’; लोकसभा निवडणुकीवरुन अजित पवारांचा इशारा

आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागा लढवणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. या सगळ्यात बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण हा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. आता सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीसाठी उभ्या राहणार […]