राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत कॅफेटेरिया येथे भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या.या सर्व नेत्यांनी एकत्रित फोटो काढला. त्यानंतर हा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडिायवर शेअर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर झालेल्या […]
ताज्याघडामोडी
‘गोपीचंद पडळकर यांनी स्वत:ला आवर घालावा’, महसूल मंत्र्यांचा सल्ला
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारमधील ते महत्त्वाचे मंत्री आहेत. असं असताना सरकारमधीलच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्याने सत्ताधारी पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे […]
“पक्षाचं नाव आणि चिन्ह अजूनही उद्धव ठाकरेंना मिळू शकतं”, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचं सूचक विधान
शिवसेनेत फूट पडून जवळपास दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्याप शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निर्णय दिला आहे. संबंधित निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशानंतरही विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभु […]
विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालय नाराज ; दिले महत्वाचे निर्देश
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील शिवसेनेच्या बंडासंबंधित दोन महत्वाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेवर एका महिन्यात सुनावणी घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी बंड झाले. त्यानंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट पडले. दोन्ही गटाचा वाद निवडणूक आयोगासमोर पोहोचल्यानंतर आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक […]
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना ढेंभूतून पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार- आ आवताडे
प्रतिनिधी- पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना टेंभू पाणी योजनेतील पाणी मिळवून देण्यासाठी मी राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन निश्चितपणे शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरु असलेल्या गावभेट दौऱ्यादरम्यान दिली आहे. मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी आ […]
फिरायला नेतो सांगून काळोखात नेलं, चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
पुण्यात नेहमी काही ना काही घडत असतं. शहरात गुन्हेगारीचं प्रमाण एवढं वाढलं आहे की, विचारता सोय नाही. अशीच एक संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. एका ३० वर्षाच्या नराधमाने एका ४ वर्षीय बलिकेसोबत अश्लील कृत्य केल्याचा भयानक प्रकार कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. अंगणात खेळत असताना पीडित बालिकेला अंधारात आडोशाला घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा […]
मंगळवेढा तालुक्यातील 35 गाव उपसासिंचन योजनेसाठी अभिजीत पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दुष्काळ जाहीर करून चारा डेपो सुरू करण्यासह विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष मंगळवेढा येथील ३५ गावातील उपसासिंचन योजनेबाबत त्रुटी पूर्ण करून भरघोस निधी उपलब्ध करण्याबाबत बैठक घेण्याची विनंती करणारे निवेदन विठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजित पाटील यांनी मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना शुक्रवार दिनांक १५सप्टेंबर रोजी वर्षा बंगला, मुंबई येथे सादर केले व महत्त्वपूर्ण विषयांवर […]
आधी सिव्हिल इंजिनीअरचे काम; नंतर बनला टिकटॉक स्टार, ऑनलाइन गेममध्ये गुंतला, धक्कादायक कृत्य करत पलायन
ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे हवेत म्हणून चोऱ्या करणाऱ्या टिकटॉक स्टारला साकीनाका पोलिसांनी अटक केली. अभिमन्यू गुप्ता असे त्याचे नाव असून चोरीनंतर चक्क विमानाने तो रांची येथे गेला होता. अभिमन्यू याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. साकीनाका येथे राहणाऱ्या संपत (बदललेले नाव) यांच्या घरातून पैसे चोरीला गेले होते. कामानिमित्त बाहेर गेलेले संपत सकाळी परतले त्यावेळी […]
सावकाराच्या जाचामुळे महिलेची रेल्वेखाली आत्महत्या
कसारा रेल्वे मार्गावरील शहाड ते आंबिवली दरम्यान रेल्वे रुळावर एक 46 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांना ही आत्महत्या असल्याचं आढळून आलं असून, या महिलेनं चार दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात एका सावकरांकडून होणाऱ्या छळाची तक्रार केली होती. तर दुसऱ्या घटनेत कसारा इथं एका प्रेमीयुगुलानंही घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या […]
बकऱ्यांच्या शेडमध्ये लपून बसलेल्या बहिणीचा दोन सख्या भावांकडून खून, धक्कादायक कारण
काही वर्षांपूर्वी सैराट हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आंतरजातीय प्रेमसंबंध असल्यामुळं भावांनी बहिणीचा खून केल्याची घटना त्यामध्ये दर्शविली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सैराटसारखी धक्कादायक घटना घडलीय. प्रेम संबंध असल्याच्या आरोपातून दोन सख्या भावांनी बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून ठार केलंय. या प्रकरणी आरोपींना […]