ताज्याघडामोडी

‘गोपीचंद पडळकर यांनी स्वत:ला आवर घालावा’, महसूल मंत्र्यांचा सल्ला

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत.

विशेष म्हणजे राज्य सरकारमधील ते महत्त्वाचे मंत्री आहेत. असं असताना सरकारमधीलच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्याने सत्ताधारी पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. असं असताना भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकर यांना स्वत:ला आवर घालावा, असा सल्ला दिला आहे.

“गोपीचंद पडळकर आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक दिवसांपासून आहे. ते एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे होते. आपण आता एकत्र असल्याने त्यांनी विधान करताना स्वतःला आवर घालावा. सरकारच्या स्थैर्यासाठी आपसातले मतभेद बाजूला ठेवावे”, असा सल्ला विखे पाटील यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *