सर्वत्र दिवाळीची धामधामू सुरू आहे. पण मालेगावमध्ये ऐन दिवाळीच्या आदल्यादिवशी खळबळजनक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चुलत भावाने चुलत भावाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना मालेगावच्या डोंगराळे येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. मालेगावच्या डोंगराळे इथं ही घटना घडली आहे. ज्ञानेश्वर व्ह्यालिज असं मयत तरुणाचं नाव आहे. या […]
ताज्याघडामोडी
‘मला मारू नका, मी मरेन’, पतीची वारंवार विनवणी, मात्र निर्दयी पत्नीने प्रियकरासाठी घेतला जीव
अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला सत्र न्यायाधीश आर. आर. भोसले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पंकज चंद्रकांत कडू (२७, रा. सोनेगाव) आणि सरिता शेखर कनोजिया (४०,रा. जयताळा) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर शेखर बबलू कनोजिया (४७, रा. जयताळा) यांच्या हत्येचा आरोप होता. मिळालेल्या माहितीनुसार, सरिता आणि शेखर […]
‘शरद पवार खरे ओबीसी नेते, पण त्यांना मराठ्यांची अडचण’, बच्चू कडूंचा मोठा आरोप
मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. अशात प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. पवारांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिलं. त्यांनी ठरवलं असतं तर मराठा समाजालाही त्यावेळी आरक्षण मिळालं असतं, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू […]
खेळण्याच्या वयात 11 वर्षीय मुलीच्या गळ्यात बांधलं मंगळसूत्र; 13 वर्षाचा नवरदेव, आता..
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. प्रत्येक व्यक्ती या दिवसाची आतुरतेनं वाट पाहात असतो. मात्र, काही वेळा लग्नाच्या अशा काही घटना समोर येतात, ज्या हादरवून टाकतात. अशीच एक घटना बीडमधून समोर आली आहे. बालविवाहाचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात उघडकीस आला आहे. यात 11 वर्षांची नवरी अन् 13 वर्षांचा नवरदेव होता. […]
सणासुदीच्या दिवसात अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जोरदार मोहीम
सोलापूर अन्न प्रशासनाचे धाडसत्र सुरु सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवार्द करुन माल जप्त केला आहे. दि. 31 ऑगस्ट ते दि. 07 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तेल व वनस्पती- तेलाचे एकूण 5 नमुने व वनस्पतीचे 2 नमुने, दूध या अन्न पदार्थाचे 55 नमुने व […]
सहकार शिरोमणी कारखान्याचा पहिला हप्ता 2700 रुपये
गत 2022-23 च्या हंगामातील सर्व देणी बँकेत जमा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगाम 2023-24 मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता प्रती टन 2700 रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी जाहिर केले. त्याचबरोबर गत हंगामातील ऊस पुरवठादार शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार यांची प्रलंबित […]
कपडे काढून माझ्यासमोर उभे राहिले आणि.. शिक्षकाच्या त्या कृत्यामुळे भेदरली विद्यार्थिनी, असा उघडकीस आला घृणास्पद प्रकार
शाळा हे विद्येचं मंदीर असतं आणि शिक्षकांना तर मोठा मान असतो. पण काही जण आपल्या कृत्याने या शिक्षकी पेशाला काळिमाच फासतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या मथुरामधून उघडकीस आली आहे. जिथे एका शिक्षकाच्या कृत्याने गदारोळ माजला आहे. मथुरा येथील शाळेतील एका शिक्षकाने वर्गातच एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कपडे न […]
वडिलांची किडनी खराब आहे म्हणत गरीब प्रियकराकडून कडून उकळले 20 लाख! सत्य कळताच त्यानं…
प्रेमासाठी लोक काही करायला तयार होतात. मात्र, प्रेमात धोका मिळाला तर आयुष्य उद्धवस्त होते. असचं काहीस बिहारमधील एका तरुणासह घडले आहे. गर्लफ्रेंडने वडिलांची किडनी खराब झाल्याचे सांगत त्याच्याकडून तब्बल 20 लाख रुपये उकळले. प्रेयसीने केलेल्या या आर्थिक फसवणुकीमुळे या तरुणाने आणि त्याच्या आईने शेवटी आत्महत्या केली. स्निग्धा मित्रा आणि परिजात मित्रा आत्महत्या करणाऱ्या आई आणि […]
राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; कृषीमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत हवामानातील असमतोलामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी विरोधी पक्षाकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात होती. आता दिवाळी सणाच्या तोंडावर राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यास सुरुवात झाल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे […]
राज्यात पुढील 48 तास पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती
राज्यासह देशात गुलाबी थंडी चाहूल लागली आहे. मात्र, काही भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ पाहायला दिसत आहे.अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील काही भागात पुढील 48 तास पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज महाराष्ट्रासह देशात पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला […]