ताज्याघडामोडी

राज्यात पुढील 48 तास पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती

राज्यासह देशात गुलाबी थंडी चाहूल लागली आहे. मात्र, काही भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ पाहायला दिसत आहे.अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील काही भागात पुढील 48 तास पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

आज महाराष्ट्रासह देशात पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना वायू प्रदूषणामध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील पाच दिवसांत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, 11 नोव्हेंबरपर्यंत येथे पाऊस संपण्याची शक्यता आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, ओडिशा आणि गोव्यातही पाऊस पडू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *