कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील शिक्षण घेतलेल्या १० विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या “कॉग्निझंट” कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील […]
ताज्याघडामोडी
दुचाकीवरून परतत होतं जोडपं; घाटात पुढील बसचा ब्रेक फेल, तुटली सहजीवनाची दोर
वाईहून महाबळेश्वरकडे जात असताना बुवासाहेब मंदिराजवळ अवघड वळणावर अचानक बसचा ब्रेक फेल झाला. या बसच्या पाठीमागे दुचाकीस्वार पत्नीसह पाचगणीकडे चालला होता. ब्रेक फेल झाल्यानंतर बस पाठीमागे येत असताना चालकाने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण बस पाठीमागे सरकल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीवर बस गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. प्रीती योगेश बोधे (४०) असे मृत […]
आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीला यश
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान न झाल्याने अनेक शेतकरी व पशुपालक पाण्याअभावी अक्षरशः हवालदील झाले आहे. दक्षिण भागाच्या सदर गावातील नागरिकांनी या योजनेचे पाणी सोडण्याबाबत आमदार आवताडे यांच्याकडे मागणी केली होती. या भागातील जनतेच्या सदर मागणी अन्वये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत पाणीटंचाई असलेल्या मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व तलाव, बंधारे पाण्याने भरून देण्याबाबत […]
उसने पैसे न दिल्याचा राग, नवऱ्यासमोर बायकोचा विनयभंग; आरोपीची पोलिसांनी काढली धिंड
उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पैसे उसने घेणाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात उघडकीस आला आहे. ही घटना घडल्यानंतर त्या नराधमाची हडपसर परिसरात गुरुवारी भरपावसात पोलिसांनी धिंड काढली. इम्तियाज हशीम शेख (वय ४७, म्हाडा कॉलनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या […]
पंढरपूर सिंहगडच्या १२ विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड
देशातील विविध नामांकित कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहेत. सिंहगड संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउंटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होत असून “टीसीएस” कंपनीत पंढरपूर सिंहगड कॉलेज मधील १२ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मधुन नोकरी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट […]
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर ओसरणार; मान्सूनबाबत हवामान विभागाचा नवा अंदाज
राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुराचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यामुळे संसार वाहून गेला. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्यानं बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. मात्र यातच आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील काही दिवस […]
होमगार्ड्स बाबत महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! देवेंद्र फडणवीसांची घोषणा
होमगार्ड अर्थात राज्य गृहरक्षक दलातील गार्डना आता सलग सहा महिने काम दिलं जाणार आहे आणि त्यासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दर तीन वर्षांनी केली जाणारी त्यांची नोंदणी आता बंद करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो होमगार्डना होणार आहे. होमगार्ड ही स्वेच्छित सेवा […]
स्वेरीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन व एमबीए यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि एमबीए या विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयआरपी-पेटेंट, डिझाईन, ट्रेडमार्क आणि कॉपी राईट’ या विषयावर दि.१७ जुलै ते २२ जुलै २०२३ दरम्यान एक आठवड्याचा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न झाला. दीप प्रज्वलनानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांनी प्रास्ताविकात या आठवडाभर चालणाऱ्या ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ आयोजनाचा हेतू व संशोधनासाठी […]
दांपत्याने चुलत भावाला लोकेशन पाठवत शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बोलवले; समोरचे दृश्य पाहून बसला धक्का
आंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या दांपत्याने आपल्या चुलत भावाला लोकेशन पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली येथील एका शेतातील पत्र्याचे शेडमध्ये त्यांनी गळफास लावून घेतला असून गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. राहुल राजाराम परीट (वय २३) आणि अनुष्का राहुल परीट (वय-२१) असे मृत दांपत्याचे नाव आहे. जानेवारी महिन्यातच राहुल परीट याचा […]
तीन महिन्यापूर्वी लग्न, घरात कुणी नसताना टोकाचा निर्णय
जळगाव सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरूवारी दुपारी २ वाजता समोर आली आहे. तरुणाच्या आत्महत्या करण्यामागचे कारण समोर आलेलं नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवन अमरसिंग पवार (वय ३० रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असं मयत तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, […]