प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी (कॅप राऊंड १) ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार दि. २० जुलै २०२३ पासून सुरू होणार आहे. या फेरीमधून विद्यार्थी महाविद्यालय व पसंतीची शाखा निवडू शकणार आहेत. अभियांत्रिकी ची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठराविक दिलेल्या मुदतीमध्येच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या मध्ये विद्यार्थ्यांच्या हातून काही […]
ताज्याघडामोडी
प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पहिल्या कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म २० जुलै पासून सुरू
स्वेरीकडून विविध ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा पंढरपूरः ‘प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) प्रवेशासाठी पहिल्या फेरीचे (कॅप राउंड-१) ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.२० जुलै २०२३ पासून सुरु होत असून ती शनिवार दि. २२ जुलै पर्यंत चालणार आहे. या पहिल्या कॅप राउंड मधून विद्यार्थी हवे ते महाविद्यालय आणि पसंतीची शाखा मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी […]
आधार-पॅन लिंकिंगवर नवीन अपडेट! NRI, OCI साठी आयकर विभागाने जारी केल्या नवीन सूचना
आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक एकमेकांशी संलग्न केले नाही तर पॅन क्रमांक उपयोगात आणता येणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार ३० जूननंतर पॅन क्रमांक रद्द होणार असे वृत्त अनेक माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन प्राप्तिकर विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. मंगळवारी यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने विस्तृत ट्विट केले आहे. यामध्ये अकार्यरत झालेले […]
“मला माझ्या प्रियकराची भेट घडवा…”; महिलेचा टॉवरवर चढून हाय-व्होल्टेज ड्रामा
शिवपुरी – मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील मगरोनी पोलिस स्टेशन अंतर्गत एक अतिशय नाट्यमय प्रकरण समोर आले आहे. येथे पानघाटा गावातील एका विवाहितेने टॉवरवर चढून प्रियकराला बोलावण्याची मागणी केली. यावेळी महिलेने सुमारे 3 तास गोंधळ घातला. मोठ्या कष्टाने पोलिसांनी तिला खाली आणले. मात्र, महिलेला टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांना सुरक्षा आणि खबरदारीच्या दृष्टीने अनेक बंदोबस्त ठेवावा लागला. […]
आजारी पतीच्या उपचारासाठी पडेल ते काम केलं, पण चारित्र्यावर संशय असलेल्या नवऱ्याने तिलाच संपवलं
पतीच्या उपचारासाठी पैसे जमवण्याचे काम करत असताना स्वत:च्याच पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने हातोड्याने वार करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नागपुरातील नंदनवन झोपडपट्टी येथे घडली आहे. अर्चना रमेश भारस्कर (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा दाम्पत्याच्या मुलीही घरी होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती रमेश भारस्कर हा […]
पुढचे 12 दिवस राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासाह या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
जुलै महिना पावसाचा असणार आहे. राज्यात आता पुढील १२ दिवस पाऊस कायम असणार आहे. हवामान विभागाने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट दिले आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात चांगली वाढ होणार आहे. कोकणात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मासेमारांना समुद्रात […]
बस स्टॉपवरुन तरुणाचं अपहरण, पेट्रोल टाकून जिवंत पेटवलं; ५ दिवसांपूर्वीचे शब्द खरे ठरले
कर्नाटकची राजधानी बंगळुरुच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. तरुणाला गंभीर अवस्थेत व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणाचां आधी अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शशांक असं तरुणाचं नाव आहे. शशांकचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. ही तरुणी शशांकची दूरची नातेवाईक होती. तिच्याच कुटुंबियांनी शशांकला जिवंत पेटवल्याचं त्याचे […]
रविवारच्या सुट्टीदिवशी बेत आखला, पाच मित्र जमले अन् नदीवर गेले, तोल गेल्यानं होत्याचं नव्हतं..
राज्यात पावसानं हजेरी लावल्यानंतर पावसाळी पर्यटनाच्या निमित्तानं अनेक जण घराबाहेर पडत आहेत. धबधबा, तलाव, धरणे आणि नदी परिसरात गेल्यानंतर पर्यटकांकडून किंवा नागरिकांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. यामुळं राज्यात दोन दिवसात विविध ठिकाणी अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात कन्हान नदीत मासेमारी करताना दोन जणांचा बुडून […]
पुन्हा चक्रीवादळाचं सावट; राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा
देशातील अनेक भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच आता 18 जुलैच्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम हा राज्यातील पावसाच्या स्थितीवर देखील होणार आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते […]
वंचितच्या जिल्हा महासचिवांची हत्या; चर्चेला बोलावलं अन्…
जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिवांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष आढाव असं त्यांचं नाव आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संतोष आढाव यांची हत्या त्यांच्या चुलत्यानंच केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं […]