ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या रुक्मिणी शिर्के ची ५ कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी अभियांत्रिकीच्या शिक्षणात कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने अल्पावधीतच सातत्यपूर्ण निकाल, प्लेसमेंटची दर्जेदार वाटचाल करून जिल्ह्यात अग्रस्थान पटकावले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केलेल्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या पंढरपूर येथील कुमारी रुक्मिणी सुनिल शिर्के हिची कॅम्पस प्लेसमेंट […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घरी शिकवणी घेण्यास येणार्‍या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

घरी शिकवणी घेण्यासाठी येणार्‍या शिक्षकानेच 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका 14 वर्षाच्या मुलीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. 272/23) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अलोक सर (रा. घोरपडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घोरपडीमध्ये एप्रिल 2023 […]

ताज्याघडामोडी

रिक्षा खरेदीसाठी पैसे देण्यास नकार, मुलगा संतापला; पोटच्या पोरानं आईला मारलं

रिक्षा खरेदीसाठी पैसे देण्यास आईने नकार दिल्याने मुलाने शिवीगाळ करून आईच्या डोक्यात दगड मारला. गांधीनगर, पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. अतुल सुगंधराव खंडागळे (वय ३०) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विमलबाई खंडागळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या भावाला भेटायला जाण्यासाठी गांधीनगर कमानीसमोर आल्या. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गावात त्रास देणाऱ्या गुंडाला गावकऱ्यांनीच संपवला, लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. तालुक्यातील सेलू (मुरपाड) येथे गावकऱ्यांनी मिळून एका गुंडाची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. पोलीस इतर गावकऱ्यांचा शोध घेत आहेत. झाले असे की, आकाश उल्हास उईके (वय ३०) हा गुंड चार दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर गुंडगिरीसह चोरी व […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढा शहरात राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचे जंगी स्वागत होणार

(चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली माहिती) प्रतिनिधी/- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधील झालेल्या फुटी नंतर शरद पवार यांचा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच दौरा असणार आहे. सोलापूर येथील कार्यक्रम झाल्यानंतर सांगोला कडे जाताना मंगळवेढा नगरीत शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अधिकच्या महिन्यात सासरा अन् मेहुण्याने केली जावयाची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण जालना शहर हादरलं आहे. यामध्ये सध्या अधिकचा म्हणजे धोंड्याचा महिना चालू आहे. चालीरीतीमुळे या महिन्यात लेक जावयाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. जावयाला दान देत मुलगी आणि जावयाला धोंडे जेवण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. पण, या महिन्यात मेव्हणे आणि सासऱ्याने आपल्या जावयाचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात […]

ताज्याघडामोडी

पोलीस भरती प्रशिक्षण अकादमीत मुलींचे लैंगिक शोषण, रेल्वे पोलिसाला मैत्रिणीसह अटक

पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस चालवणाऱ्या रेल्वे पोलिसानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रेल्वे पोलिसात कार्यरत पोलीस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सो व विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी समाधान गावडे (वय २८ वर्ष) आणि त्याला मदत करणारी त्याची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आत्महत्या केल्याचा बनाव रचत मुलीचा जन्मदात्याकडून खून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

मुखेड तालुक्यातील मनु तांडा येथे 2 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आई-वडिलांनी या मुलीच्या पार्थिवावर घाईत अंत्यसंस्कार केले. यामुळे हा घातपात असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगू लागली. याच संशयाने पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलीस तपासात पित्यानेच मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपी पित्याला 10 ऑगस्टला अटक केली आहे. मुलीचा […]

ताज्याघडामोडी

नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असणारे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री नबाव मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. सक्तवसुली संचलनालयाने सर्वोच्च न्यायालयात जामिनीला विरोध केला नसल्याने मलिक यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे नवाब मलिक तब्बल १ वर्ष ५ महिन्यानंतर जेलबाहेर येणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव पुढील २ […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत, १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार

राज्यात १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार, तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार असून मान्सूनच्या नवीन पद्धतीनुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यात पाऊस पडला नाही. मात्र, शेवटच्या […]