घरी शिकवणी घेण्यासाठी येणार्या शिक्षकानेच 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका 14 वर्षाच्या मुलीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. 272/23) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अलोक सर (रा. घोरपडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घोरपडीमध्ये एप्रिल 2023 मध्ये घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलोक हा 35 ते 40 वर्षाचा शिक्षक फिर्यादी यांना शिकवण्यासाठी घरी येत होता. फिर्यादी या घरी एकट्या असता त्याचा गैरफायदा घेऊन त्याने जबरदस्तीने फिर्यादीशी शारीरीक संबंध केले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर तिच्या लहान भावाला मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली, हे समजल्यावर तिने शिक्षकानेच आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सत्तार तपास करीत आहेत.