नवी दिल्ली : लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा अपॉईंटमेंट बंधनकारक नाही. लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन तिथेच नोंदणी करुन लस घेता येईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. ग्रामीण भागांमध्ये लोकांना लस घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. यासंदर्भात सरकारनं म्हटलं की, “ज्या व्यक्तीचं वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा […]
ताज्याघडामोडी
धुळे-सोलापूर हायवेवर ट्रकचा अपघात; स्थानिकांकडून गाडीतल्या 75 लाखांच्या मालाची लूट
उस्मानाबाद : बंगळुरूहून दिल्लीकडे जाणारा कंटेनर रिमझिम पावसाच्या सरींमुळे धुळे-सोलापूर हायवेवर असलेल्या तेरखेडा गावानजिक पहाटे तीन वाजता पलटी झाला. ड्रायव्हरने पुढची काच फोडून बाहेर येऊन आपला जीव कसाबसा वाचवला. परंतु अंधाराचा फायदा घेत स्थानिक रहिवाशांनी गाडीतला जवळपास 75 लाखांचा माल लुटून नेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सदरची घटना घडली आहे. या प्रकारानंतर लोकांनी पळवलेला माल ताब्यात घेण्यासाठी […]
गाव गुंडाची काढली धिंड; वाहनांची तोडफोड केल्यानं पोलिसांची कारवाई
पुणे, 15 जून: काही दिवसांपूर्वी पुण्यातील वाकड परिसरात काही तरुणांनी बऱ्याच चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. रात्रीत झालेल्या या संताजपजनक प्रकारानंतर परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तसेच या गुंडाच्या टोळक्याची परिसरातील दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. संबंधित गाव गुंडांनी दोन ते […]
दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित
कोणत्याही परवानगी शिवाय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलिसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याचा ठपका ठेवत दोन फौजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. याप्रकरणी रावसाहेब दानवे यांनी तक्रार दिली होती. पोलीस अधीक्षकांनी एकाच वेळी 5 पोलिसांना तडकाफडकी निलंबित केल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड […]
कोरोनाविरोधात अमेरिकेची नोव्हाव्हॅक्स रणांगणात, 90 टक्के प्रभावी
अमेरिकेच्या नोव्हावॅक्स फार्मा कंपनीने अत्यंत प्रभावी नोव्हाव्हॅक्स लसीच्या उत्पादनाची घोषणा आज केली. ही लस गंभीर रुग्णांवरही 90 टक्के प्रभावी असून कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्सवरला रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हिंदुस्थानात या लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिटय़ूट करणार आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी हिंदुस्थानात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनबरोबर आणखी एक लस उपलब्ध होणार आहे. अमेरिकेच्या नोव्हावॅक्स या […]
कोव्हिशिल्डचा डोस घेतल्यानंतर ४५७ जणांचा, तर कोव्हॅक्सिनचा डोस घेणाऱ्या २० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाविरोधात लढण्यासाठी सध्या देशभरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सीएनएन न्यूज १८ ने सरकारी माहितीच्या आधारे दिलेल्या आकडेवारीनुसार लसीकरणामुळे आतापर्यंत देशात ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत. अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला वैज्ञानिक […]
शिक्षिकेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; पर्समध्ये सापडली सुसाईड नोट
अहमदनगर : नगर शहरात राहणाऱ्या एका शिक्षिकेने इमामपूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वंदना रेपाळे असं या शिक्षिकेचं नाव असून त्या धनगवाडी येथील शाळेत नोकरीला होत्या. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर सुनील पांडुरंग टिमकरे हे आपल्या शेतात वीज पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना […]
लाच घेतल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडले
बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मंजुषा विधाते असे त्यांचे नाव असून येत्या 30 जूनला त्या सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेत मंजुषा विधाते तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांचे टीडीआर संदर्भात एक प्रकरण महापालिकेत अडकले […]
लेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान आवताडे यांची ग्वाही
लेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान आवताडे यांची ग्वाही (प्रतिनिधी): पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये यश संपादन केल्याबद्दल नूतन आमदार समाधान आवताडे यांचा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या वतीने लेबर फेडरेशनमध्ये सभेसाठी आले असता अभिनंदन पर सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारास उत्तर देताना आ. समाधान आवताडे म्हणाले की, […]
धक्कादायक, सख्ख्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार; कुटुंब हादरलं…!
नवी मुंबई, 14 जून : नवी मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये गोळीबार झाला असून एका पित्यानेच आपल्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला आहे. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्यांनी गोळीबार केला आहे. एक मुलगा विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात […]











