गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक, सख्ख्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार; कुटुंब हादरलं…!

नवी मुंबई, 14 जून : नवी मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये गोळीबार झाला असून एका पित्यानेच आपल्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला आहे. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्यांनी गोळीबार केला आहे. एक मुलगा विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली.

विजय याची प्रकृती चिंताजनक असून ऐरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोळी झाडणाऱ्या पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *