गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अबब !700 कोटीची करचोरी

आयकर विभागाने धाड टाकून केलेल्या कारवाईत ७०० कोटींची करचोरी समोर आली असल्याचा दावा केला आहे. आयकर विभागाकडून हैदराबादमधील दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर धाड टाकत कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान ११ कोटी ८८ लाखांची रोख रक्कम तसंच १ कोटी ९३ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) दिली आहे. कारवाई करण्यात […]

ताज्याघडामोडी

अकलूजला जाऊन घेतला विजयदादांचा आशीर्वाद 

राजकारणात कालचा मित्र आज मित्र नसतो आणि आजचा शत्रू उद्या शत्रू नसतो अशी म्हण आहे.सोलापूर जिल्हयाच्या गेल्या ५० वर्षाच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला तर ७० आणि ८० च्या दशकात अकलूज आणि करमाळा येथून जिल्हयाच्या राजकारणाची सूत्रे हालत होती अगदी जिल्हा परिषद सदस्य ते जिल्ह्यातील कुठल्या तालुक्याच्या कोण आमदार असावा याचा  निर्णय येथून होत होता.पुढे करमाळ्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शरद पवारांच्या आजारपणा बाबत विकृत फेसबुक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पवार साहेब तिथे उपचार घेत असून, सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. शरद पवार यांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सूर बाहेर पडले.मात्र काही विकृत प्रवृत्तींनी  शरद पवारांच्या आजारपणाबाबत […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर पोटनिवडणूक छाननीत आठ उमेदवारांचेअर्ज अवैध

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. यामध्ये 38 उमेदवारंपैकी पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.अर्ज छाननी प्रक्रीयेवेळी निवडणूक निरिक्षक दिब्य प्रकाश गिरी उपस्थित होते. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 38 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 30 उमेदवारांचे अर्ज […]

ताज्याघडामोडी

पक्षाने केलेली कारवाई मी जनतेसाठी कठोर अंतःकरणाने स्वीकारलेली आहे

शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून दिनांक 31 मार्च 20 21 रोजी प्रसिद्ध झाल्या प्रमाणे पक्ष विरोधी कार्यवाही केल्याने मला पक्षातून व पदावरून काढून टाकण्यात आले ची कारवाई केल्याचे दिसून आले व पक्षप्रमुखांनी सदरची कारवाई करणे अपेक्षित होते सदर कारवाई जनतेसाठी मी कठोर अंतःकरणाने स्वीकारलेली आहे शिवसेना पक्षाने सोलापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू चोरांकडून लाखाची लाच घेणारा उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड निलंबित

वाळू माफियांकडून गाडी सुरू ठेवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या माजलगाव येथील लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना 19 फेब्रुवारी च्या रात्री माजलगाव शासकीय निवासस्थानी रंगेहाथ पकडले होते.या हे प्रकरण सुरू असताना शासनाने महिन्यानंतर निलंबनाची कारवाई केली आहे.माजलगाव येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या श्रीकांत गायकवाड याने वाळू ची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाच मागितली होती […]

ताज्याघडामोडी

एप्रिलमध्ये एवढ्या दिवस बंद असणार बँका

क्लोजिंग अकाऊंट कामकाज 1 एप्रिलला असल्यामुळे बँकेची कामे होणार नाहीत. उरलेल्या सामान्य सुट्या आहेत. ज्यात 4 रविवार आणि 2 शनिवार आहेत. 31 मार्चला बँक खुल्या असतील. 31 मार्चला आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने केवळ कर्मचारी असतील. तर ग्राहकांसाठी बँक बंद असणार आहे.यानंतर 2 एप्रिल रोजी गुड फ्रायडेला सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील. यानंतर रविवारी 4 […]

ताज्याघडामोडी

LPG कनेक्शन धारकांसाठ मोठी बातमी

तुम्ही जर केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत  मोफत LPG कनेक्शन   घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या स्वरुपात केंद्र सरकार लवकरच बदल करण्याची शक्यता आहे. ‘मनी कंट्रोल’ ने दिलेल्या बातमीनुसार पेट्रोलियम मंत्रालय 2 नव्या स्ट्रक्चरवर सध्या काम करत आहे. त्याची लवकरच अमंलबजावणी करण्यात येईल. केंद्र सरकारने या […]

ताज्याघडामोडी

पुन्हा लॉकडाऊन लावला तर लोकांच्या खात्यात पैसे जमा करा, काँग्रेस नेत्याचा सरकार सल्ला

मुंबई, 30 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे औरंगाबाद , बीड, नागपूर, जळगावमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण, लॉकडाऊन जर लावण्याचा निर्णय घेतला जात असेल तर बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रक्कमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिला आहे. […]

ताज्याघडामोडी

खासगी दवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना

खासगी दवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना        पंढरपूर. 30:-   जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांनी तात्काळ बेडची संख्या वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.               कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे […]