ताज्याघडामोडी

खासगी दवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना

खासगी दवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना

       पंढरपूर. 30:-   जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांनी तात्काळ बेडची संख्या वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.

              कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन शेगर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले तसेच खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते. 

                  यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी सुरु असलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधा, मुबलक प्रमाणात औषधसाठा,ऑक्सिजनची पुरवठा उपलब्ध ठेवावा. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढवावी. संपर्क साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून तात्काळ तपासणी करावी. नगरपालिकाक्षेत्रात नगरपालिका प्रशासनाने तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. खाजगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत जास्तीत-जास्त रुग्णांना लाभ मिळवून द्यावा. खासगी पॅथॉलॉजीमध्ये तपासणी केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची माहिती तात्काळ आरोग्य विभागाला द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.

          यावेळी बैठकीत उपस्थित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या  यावर संबधितांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *