ताज्याघडामोडी

एप्रिलमध्ये एवढ्या दिवस बंद असणार बँका

क्लोजिंग अकाऊंट कामकाज 1 एप्रिलला असल्यामुळे बँकेची कामे होणार नाहीत. उरलेल्या सामान्य सुट्या आहेत. ज्यात 4 रविवार आणि 2 शनिवार आहेत. 31 मार्चला बँक खुल्या असतील. 31 मार्चला आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने केवळ कर्मचारी असतील. तर ग्राहकांसाठी बँक बंद असणार आहे.यानंतर 2 एप्रिल रोजी गुड फ्रायडेला सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील. यानंतर रविवारी 4 एप्रिल रोजीही बँका राहतील. यानंतर 5 एप्रिल रोजी बाबू जगजीवन राम जयंतीच्या दिवशी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुटी असल्याने बँका बंद असतील.

10 एप्रिल रोजी महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी बँकांमध्ये काम होणार नाही आणि 11 एप्रिल रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. यानंतर, गुढी पाडवा असल्यामुळे बँकांना 13 एप्रिल रोजी सुट्टी असेल. दुसर्‍या दिवशी 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे बँकांमध्ये सुट्टी असेल. 15 एप्रिल रोजी, हिमाचल दिवस / बंगाली नवीन वर्षाचा दिवस बोहाग बिहू आणि सिरहुलची सुट्टी असेल. त्यानंतर, बोहाग बिहूमुळे 16 एप्रिल रोजी बँका बंद राहतील आणि 18 एप्रिलला रविवारची सुट्टी असेल. यानंतर राम नवमीच्या सुट्टी निमित्ताने 21 एप्रिल रोजी बँक बंद राहील. त्यानंतर 24 एप्रिल रोजी चौथा शनिवार आणि 25 रोजी रविवारी बँकांमध्ये कोणतीही काम होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *