तुम्ही जर केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मोफत LPG कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या स्वरुपात केंद्र सरकार लवकरच बदल करण्याची शक्यता आहे. ‘मनी कंट्रोल’ ने दिलेल्या बातमीनुसार पेट्रोलियम मंत्रालय 2 नव्या स्ट्रक्चरवर सध्या काम करत आहे. त्याची लवकरच अमंलबजावणी करण्यात येईल. केंद्र सरकारने या बजेटमध्ये एक कोटी नवे कनेक्शन देण्याची घोषणा केली होती. आता सरकार OMCs च्या माध्यमातून पेमेंट मॉडेलमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.नव्या प्रकारानुसार 1600 रुपयांचे अगाऊ पेमेंट कंपनी एकरकमी वसूल करणार आहे. सध्या OMCs च्या माध्यमातून ही रक्कम EMI च्या माध्यमातून वसूल करण्यात येते. तर या योजनेतील अन्य 1600 रुपयांची सबसिडी सरकार यापुढे देखील देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
