ताज्याघडामोडी

अकलूजला जाऊन घेतला विजयदादांचा आशीर्वाद 

राजकारणात कालचा मित्र आज मित्र नसतो आणि आजचा शत्रू उद्या शत्रू नसतो अशी म्हण आहे.सोलापूर जिल्हयाच्या गेल्या ५० वर्षाच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला तर ७० आणि ८० च्या दशकात अकलूज आणि करमाळा येथून जिल्हयाच्या राजकारणाची सूत्रे हालत होती अगदी जिल्हा परिषद सदस्य ते जिल्ह्यातील कुठल्या तालुक्याच्या कोण आमदार असावा याचा  निर्णय येथून होत होता.पुढे करमाळ्याचे राजकीय वजन संपले आणि सोलापूर शहरावर सुशीलकुमार शिंदे तर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर मोहिते पाटील अर्थात अशी परिस्थिती अगदी २०१० पर्यन्त होती.पुढे अकलूजचा जिल्ह्यावरील प्रभाव ओसरत गेला आणि ज्या त्या तालुक्यातील स्थानिक नेतृत्व स्वबळावर विश्वास ठेवत वाटचाल करू लागले.अशातच माढा आणि अकलूज यांच्यात २००७ मध्ये सुरु झालेला सुप्त संघर्ष शिगेला पोहोचला.आणि मोहिते पाटील गटाला शह देण्यासाठी आमदार संजय शिंदे यांना साथ मिळाली ती पंढरपूरातून परिचारकांची आणि मंगळवेढा तालुक्यातून समाधान आवताडे यांची.मात्र आता राजकारणाने पुन्हा नवा रंगमंच उभारला असून यात आता समाधान आवताडे समर्थक,परिचारक सर्मथक  आणि विजयसिह मोहिते पाटील समर्थक या पोटनिवडणुकीत हातात हात घालून भाजपच्या विजयासाठी काम करणार आहेत.काल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील   भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी  थेट अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर जाऊन भाजपचे जेष्ठ नेते,मा.खा. विजयसिह मोहिते-पाटील यांचा आशीर्वाद घेतला.या साऱ्या घटनाक्रमामुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील कट्टर मोहिते-पाटील सर्मथकांकडून समाधान व्यक्त होत आहे.     

      पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात मोहिते-पाटील हाच पक्ष अशी निष्ठा असलेले अनेक कार्यक्रर्ते आहेत.यातील काही कारकर्ते तर अगदी दोन पिढ्यापासून मोहिते-पाटील कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो कि जिल्हापरिषद या ठिकाणी असलेले मोहिते पाटील गटाच्या वर्चस्वास आमदार संजय शिंदे यांनी घरघर लावण्यास सुरुवात केली त्यावेळी आ.शिंदे यांना सर्मथन देणारे,पाठबळ देणारे नेत्यांना  जिल्ह्यातील मोहिते-पाटील समर्थकांच्या रोषास सामोरे जावे लागल्याचे दिसून आले आहे.     

                समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आवताडे यांच्या विजयाची जबाबदारी जशी परिचारक सर्मथक पार पडणार आहेत तशीच जबाबदारी आता मोहिते पाटील सर्मथक पार पाडतील असा विश्वास आवताडे सर्मथकांकडून व्यक्त होत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *