वाळू माफियांकडून गाडी सुरू ठेवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या माजलगाव येथील लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना 19 फेब्रुवारी च्या रात्री माजलगाव शासकीय निवासस्थानी रंगेहाथ पकडले होते.या हे प्रकरण सुरू असताना शासनाने महिन्यानंतर निलंबनाची कारवाई केली आहे.माजलगाव येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या श्रीकांत गायकवाड याने वाळू ची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाच मागितली होती त्यात 65 हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाणे कारवाई केली होती यामुळे जिल्ह्यात महसुल विभागात चांगलीच खळबळ उडाली होती.आज निलंबनाची कारवाई केल्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
