नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा उद्रेक रोज नव्या पातळीवर पोहचत असल्याचे दिसत आहे. रोज कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासात पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशात एका दिवसात सुमारे साडेतीन लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. झाली आहे. ही आतापर्यंतची […]
ताज्याघडामोडी
कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर
अखेर भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 रुपये असणार आहे. तर […]
टपली मारल्याच्या रागातून पैलवानाचा खून
पुणे -येता जाता टपल्या मारल्याच्या रागातून पैलवानाचा कुऱ्हाड आणि तलवारीने वार करून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील अल्पवयीन चौघांसह सात जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी 48 तासांत ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी रात्री गणराज चौकाजवळ घडली. सचिन तानाजी वाघमारे (22), सोमनाथ दत्तात्रय गाडे (25, दोघे रा.आंबेगाव पठार), तुषार जालिंदर सरोदे (25, रा. कात्रज) अशी अटक आरोपींची […]
धक्कादायक! डॉक्टरचा घरात आढळला मृतदेह; बेशुद्ध बहिणीचाही अंत
पुणे : डेक्कन येथील प्रभात रस्ता परिसरातील घरामध्ये डॉक्टर मृतावस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर त्यांची बहिण घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली, पोलिसांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केली. मात्र उपचारादरम्यान बहिणीचाही मृत्यु झाला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. डॉ.सुबीर सुधीर रॉय (वय 68, रा. श्वेता टेरेस, भोंडे कॉलनी, प्रभात रोड, डेक्कन), […]
लॉकडाऊनमुळे दुकानं बंद, दारूची तहान सॅनिटायझरनं भागवली; 7 जणांचा मृत्यू
यवतमाळ, 24 एप्रिल: सध्या राज्यात कोरोना विषाणू वेगात पसरत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परिणामी दारूची दुकानं बंद असल्यानं अनेकांनी दारुला पर्याय म्हणून सॅनिटायझर प्यायला सुरुवात केली आहे. यवतमाळमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील काही लोकांनी गावात दारू मिळत नसल्यानं सॅनिटायझरचं प्राशन केलं आहे. त्यामुळे सात […]
राष्ट्रवादीच्या “या” आमदारावर हनी ट्रॅपचा प्रयत्न;गुन्हा दाखल
पुणे जिह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी हनी ट्रॅपचा प्रयोग करणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार एका युवतीमुळे उघडकीस आला असून, […]
संकटाच्या काळातही Remdesivir चा काळाबाजार!
अकोला, 24 एप्रिल: कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातलं आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोना स्थिती आणखी बिकट आहे. राज्यात सध्या ऑक्सिजनची आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणावत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. आपल्या जीवाभावाचा माणूस जीवंत राहावा यासाठी नातेवाईक वाट्टेल तेवढे पैसे मोजायला तयार आहेत. अशा परिस्थितीत अकोला शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारही वाढला […]
पंतप्रधान मोदी लाँच करणार ई-प्रॉपर्टी कार्ड
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी स्वामित्व योजनेतंर्गत ई-संपत्ती कार्डांचे ( E property cards) वितरण करणार आहेत. आजच्या समारंभात ग्रामीण भागातील तब्बल 4.09 लाख लोकांना ई-संपत्ती कार्ड देण्यात येईल. त्यामुळे देशभरात खऱ्या अर्थाने स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. (PM Modi to launch e property cards know how to make and all detatils) ग्रामी भागातील लोकांना या योजनेचा मोठा […]
पुत्रवियोगाच्या धक्क्याने माता-पित्याने सोडले प्राण
कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना संभाजीनगरात घडली आहे. या घटनेत दिवंगत प्राध्यापक डॉ. संजय नवले यांचे वडील माणिकराव व आई मंदाकिनी हे मृत्यू पावले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. संजय माणिकराव नवले (55) यांचे 15 मार्च रोजी उपचार सुरू असताना निधन झाले. […]
नियम पाळण्यासाठी सरपंच घालताहेत ग्रामस्थांना दंडवत
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने संचारबंदी लागू करीत निर्बंधही कडक केले आहेत. शहरासह गावातही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. तरीही अनेक ग्रामस्थ बेफिकीरपणे वागत असल्याचे दिसत आहे. हे संकट टाळण्यासाठी त्यांचे प्रबोधन केले. दवंडी दिली तरीही ते ऐकत नाहीत. गावच्या पारावर गप्पा मारत बसतात. अशा ग्रामस्थांसमोर शेवटी कामरगावच्या सरपंचाने साष्टांग दंडवत घालणे सुरू केले आहे. त्यानंतर […]