ताज्याघडामोडी

मार्चचा शेवटही पावसानेच! राज्यातील या जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटही झाली. ज्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशातच आता पावसासंदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यानुसार आता मार्चचा शेवटही अवकाळी पावसानेच होणार आहे. 30 आणि 31 मार्च तसंच 1 एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये […]

ताज्याघडामोडी

आशिष कुठेय? आई-वडील जीव तोडून धावले; लिफ्टच्या आत डोकावून पाहिले; लेकराचे पाय लटकत होते

पश्चिम दिल्लीतील विकासपुरीत एका पाच मजली इमारतीत नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना २४ मार्चला घडली. लिफ्टच्या गेटमध्ये अडकल्यानं मुलाचा मृत्यू झाला. गेटमध्ये अडकल्यानं मुलगा गंभीर जखमी झाला होता. गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना आता समोर आली आहे. मुलाचं नाव आशिष असं आहे. आशिष त्याच्या आई वडिलांसोबत सीतापुरीमध्ये राहायचा. त्याचे आई वडील […]

ताज्याघडामोडी

मला IPS व्हायचं होतं, मात्र…; १३ वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या कारखेल बुद्रुक येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क सुसाईट नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनं संपूर्ण गावासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिक्षा बाबासाहेब शेलार असं या मुलीचं नाव आहे. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे दिक्षा लहानपणापासून आपल्या मामांकडे राहत होती. तिचे […]

ताज्याघडामोडी

एकच विनंती आहे, मी आरोपी नाही… जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाने आयुष्य संपवलं

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणावेळी आव्हाडांचे बॉडीगार्ड असलेल्या मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम यांनी आयुष्याची अखेर केली. रेल्वेखाली उडी घेत वैभव कदमांनी मृत्यूला कवटाळलं. करमुसे प्रकरणात चौकशीसाठी वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ‘पोलीस आणि […]

ताज्याघडामोडी

गरिबांची सेवा हा उद्देश फार कमी डॉक्टरांचा-मा.आ प्रशांत परिचारक

 पंढरपुरात डॉ.रेश्मा करंडे यांच्या श्रीहरी नेत्रालयाचे उदघाटन आजच्या काळात गरिबांची सेवा हा उद्देश फार कमी डॉक्टरांचा आहे,आजही अशा सेवाभावी हेतूने काम करणाऱ्या डॉक्टरांना मोठ्या आदराचे स्थान असल्याचे गौरवोदगार माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी काढले.गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कर्नल भोसले चौक येथे डॉ. रेश्मा करंडे यांचे श्रीहरी नेत्रालय या डोळ्यांच्या दवाखान्याचे उदघाटन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात […]

ताज्याघडामोडी

भाजप खासदार गिरीश बापट यांचं निधन

भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसारमाध्यमांना गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आज दुख:द घटना घडली आहे. भाजपचे लोकप्रिय खासदार गिरीश बापट […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी अभियांत्रिकी व कोड माइंड टेक्नोलॉंजी मध्ये सामंजस्य करार

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉंजी (अभियांत्रिकी) शेळवे पंढरपूर व सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित कंपनी कोड माइंड टेक्नोलॉंजी, पुणे यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या नामांकित कंपनीकडून नोकरी साठी आवश्यक असणारे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी ही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या […]

ताज्याघडामोडी

झाडाखाली थांब, मी लगेच येते; मुलाला बसवून आईची समोरच विहिरीत उडी; १३ वर्षीय पोराचा टाहो

नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. डोक्यावर कर्जाचं डोंगर आणि त्यातच आजाराने त्रस्त झालेल्या एका ३० वर्षीय महिलेने आपल्या १३ वर्षीय मुलाच्या डोळ्यादेखत विहरीत उडी मारून आत्महत्या केली. मीनाबाई पंजाबराव मेने (वय ३०) असं या महिलेचं नाव आहे. हदगांव तालुक्यातील चक्री गावातील रहिवासी असलेल्या मीनाबाई मेने ह्या मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त […]

ताज्याघडामोडी

शिरसाटांच्या वादग्रस्त वक्तव्याची लगोलग चौकशी करा, ४८ तासांत अहवाल द्या, चाकणकरांचे पोलिसांना आदेश

शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधारे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी बीडच्या परळीमधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिरसाठ यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घ्यावी, अशी मागणी केली. महिला आयोगानेही या प्रकरणात आक्रमक पाऊल उचलून शिरसाट यांची लगोलग चौकशी करुन पुढील ४८ तासांत पोलिसांनी अहवाल द्यावा, असे आदेश महिला आयोगाच्या […]

ताज्याघडामोडी

पत्नीसोबत कौटुंबिक वाद, सासूसह तिच्या मानलेल्या मुलीवर संशय, जावयाचा दोघींवर हल्ला

शहरात किरकोळ कारणातून जीवघेणे हल्ले सुरूच आहेत. पुन्हा एकदा पंचवटी परिसरातील पेठरोड भागात कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. जावयाने सासूसह तिच्या मानलेल्या मुलीवर धारदार विळ्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणीला गंभीर दुखापत झाली असून सासू देखील जखमी झाली आहे. आरती वालझाडे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव […]