ताज्याघडामोडी

शिरसाटांच्या वादग्रस्त वक्तव्याची लगोलग चौकशी करा, ४८ तासांत अहवाल द्या, चाकणकरांचे पोलिसांना आदेश

शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधारे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी बीडच्या परळीमधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिरसाठ यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घ्यावी, अशी मागणी केली. महिला आयोगानेही या प्रकरणात आक्रमक पाऊल उचलून शिरसाट यांची लगोलग चौकशी करुन पुढील ४८ तासांत पोलिसांनी अहवाल द्यावा, असे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजीनगर पोलिसांना दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी श्रीमती सुषमा अंधारे यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेत टीका केली याबाबतची तक्रार महिला आयोगाकडे श्रीमती सुषमा अंधारे यांनी दाखल केली आहे.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिलेचा अपमान करून त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही महिलेबाबत लोकप्रतिनिधींकडून अशा भाषेचा वापर होणे ही गंभीर बाब आहे याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना देण्यात आले आहेत तसेच या कार्यवाहीचा चौकशी अहवाल ४८ तासांत आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *