ताज्याघडामोडी

कर्मयोगी अभियांत्रिकी व कोड माइंड टेक्नोलॉंजी मध्ये सामंजस्य करार

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉंजी (अभियांत्रिकी) शेळवे पंढरपूर व सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित कंपनी कोड माइंड टेक्नोलॉंजी, पुणे यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या नामांकित कंपनीकडून नोकरी साठी आवश्यक असणारे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी ही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री रोहन परिचारक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.

यासंदर्भात माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड होण्याचे एक स्वप्न असते परंतु त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ते बरोबर च इतर ही कौशल्ये विद्यार्थ्यांच्या अंगीभूत असणे ही आता काळाची गरज बनली आहे आणि यासाठी च कर्मयोगी महाविद्यालयाने हा सामंजस्य करार केला असून याद्वारे कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग व सिव्हील इंजिनियरिंग या विभागातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना एप्टिट्यूड स्किल, सॉफ्ट स्किल, इंटरव्ह्यु स्किल, टेक्निकल स्किल इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या करारावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच सर्व विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले. प्रा. अभिनंदन देशमाने व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *