संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होताच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या 18 महिन्यांच्या थकबाकीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केंद्र सरकारकडून मिळणारा महागाई भत्ता आणि महागाई सवलतीबाबत प्रश्न विचारण्यात आले. कोरोनाच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा 18 महिन्यांचा महागाई भत्ता बंद करण्यात आला. हा भत्ता येत्या काळात मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात […]
ताज्याघडामोडी
संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार?
१४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे (साविस) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची […]
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; सुभाष देसाईंच्या पुत्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटले आहे. यामुळे उद्धव ठाकरे नव्याने शिवसेना उभारण्यासाठी तयारी लागले आहेत. अशातच शिंदे गट उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि सर्वात जुने निकटवर्तीय माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश […]
रंगपंचमीला मनसोक्त खेळली; मग मैत्रिणींसोबत गप्पा मारताना १६ वर्षीय मुलीचा करुण अंत
रंगपंचमी दिवशी रंग खेळून झाल्यानंतर आपल्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसलेल्या एका सोळा वर्षीय मुलीचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे घडली आहे. सृष्टी सुरेश एकाड (वय १६ वर्ष राहणार जाधव वस्ती नजीक, सरडेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे) असं मयत मुलीचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी […]
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज
महाराष्ट्रात सोमवार 13 मार्च 2023 ते शुक्रवार 17 मार्च 2023 या पाच दिवसांच्या काळात हा अंदाज हवामान खात्याने अर्थात वेधशाळेने व्यक्त केला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोमवार 13 मार्च 2023 ते शुक्रवार 17 मार्च 2023 या पाच दिवसांच्या काळात पावसाची शक्यता आहे.पावसाची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह विजा आणि […]
लहान बहीण घरी आली, दरवाजा ठोठावला, आतून कुणीही दरवाजा उघडेना; उघडताच पायाखालची जमीन सरकली
आई धुणीभांडी करण्याच्या कामासाठी, तर लहान बहीण शिकवणीसाठी घराबाहेर पडल्यानंतर घरात एकट्या असलेल्या मोठ्या मुलीने गळफास घेवून मृत्यूला कवटाळल्याची घटना शनिवारी सकाळी जळगाव शहरातील पिंप्राळा येथे उघडकीस आली आहे. प्रीती मंगेश जाधव (वय २०, रा. दिक्षा भूमी नगर, पिंप्राळा-हुडको) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पिंप्राळा-हुडको […]
देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार
सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमीन वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल, अशी महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.एका एकरमागे ७५ हजार रूपये देणार असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पानीफाऊंडेशन तर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. […]
नशामुक्ती केंद्रात तरुणाला बेदम मारलं; एका हट्टानं जीव गेला; रातोरात गुपचूप अंत्यविधी, पण…
गुजरातच्या पाटणमधील एका खासगी नशामुक्ती केंद्रात तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. हार्दिक सुधार नावाच्या २५ वर्षीय तरुणाची नशामुक्ती केंद्रात १७ फेब्रुवारीला हत्या करण्यात आली. केंद्राच्या व्यवस्थापकासह इतर आरोपींनी तरुणाचा मृतदेह त्याच रात्री एका स्मशानात जाळला. यानंतर नशामुक्ती केंद्रानं तरुणाच्या काकांना फोन करून तरुणाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं सांगितलं. पोलीस […]
सब इन्स्पेक्टरनं स्वत:ला संपवलं, पोलिसांचा घरी फोन, प्रतिसाद नाही; जाऊन पाहिलं तर सारंच संपलेलं
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका पोलीस उपनिरीक्षकाने पत्नी आणि मुलाची हत्या करुन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. पोलिसांना घटनास्थळावरुन कुठलीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे या पोलिसाने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं हे गूढ सध्या पुढे आलेलं नाही. सध्या पोलीस याप्रकरणी तपास […]
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता वृद्ध मतदारांना घरी बसूनच करता येणार मतदान
निवडणूक आयोग पहिल्यांदाच 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना घरपोच मतदानाची सुविधा देणार आहे. म्हणजेच 80 वर्षांवरील लोक आणि दिव्यांग घरबसल्याच मतदान करू शकतील. कर्नाटकात यावर्षी निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने शनिवारी सांगितले की त्यांनी कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत 80 वर्षांवरील व्यक्ती आणि अपंग व्यक्तींसाठी घरोघरी मतदान करण्याची सुविधा सुरू केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव […]