ताज्याघडामोडी

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार

सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमीन वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल, अशी महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.एका एकरमागे ७५ हजार रूपये देणार असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पानीफाऊंडेशन तर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देणार आहे. जितके अॅग्रीकल्चर फीडर आहेत. हे सगळे सोलरवर चालवण्यात येणार आहेत. हे फीडर सोलरवर आणण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यात येणार आहे. 

सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसं काही पीकत नसेल तर ती शेती ३० वर्षे भाड्याने घ्यायसा राज्य सरकार तयार आहे. शेतीची मालकी तुमची असणार आहे. वर्षाला ७५ हजार रूपये भाडं देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी २ टक्क्यांनी वाढ देखील करण्यात येणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *