ताज्याघडामोडी

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता वृद्ध मतदारांना घरी बसूनच करता येणार मतदान

निवडणूक आयोग पहिल्यांदाच 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना घरपोच मतदानाची सुविधा देणार आहे. म्हणजेच 80 वर्षांवरील लोक आणि दिव्यांग घरबसल्याच मतदान करू शकतील. कर्नाटकात यावर्षी निवडणुका होणार आहेत.

निवडणूक आयोगाने शनिवारी सांगितले की त्यांनी कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत 80 वर्षांवरील व्यक्ती आणि अपंग व्यक्तींसाठी घरोघरी मतदान करण्याची सुविधा सुरू केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ‘आमची टीम अशा मतदारांकडे फॉर्म-12डी घेऊन जाईल आणि मतदान करून घेईल असही ते यावेळी म्हणाले आहेत.

याबाबत प्रयोगात गोपनीयता पाळली जाणार आहे. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओग्राफी करण्यात येणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, दिव्यांगांसाठी ‘सक्षम’ हे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे, ज्यामध्ये ते लॉग-इन करून मतदान करण्याची सुविधा निवडू शकतात.

‘सुविधा’ नावाचे आणखी एक मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे, जे उमेदवारांना नामनिर्देशन आणि शपथपत्रे दाखल करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल आहे. कुमार म्हणाले, “उमेदवार सभा आणि रॅलीसाठी परवानगी घेण्यासाठी ‘सुविधा’ पोर्टलचा वापर करू शकतात.” तसेच, ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतदारांच्या हितासाठी ‘नो युवर कॅन्डिडेट’ (केवायसी) ही मोहीम सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *