Uncategorized

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी दिनेश माने-चौगुले यांची निवड

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी भाळवणी ता.पंढरपूर येथील दिनेश माने -चौगुले यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष विजयसिह देशमुख यांच्या हस्ते या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.हे पत्र प्रदान करतेवेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघ अध्यक्ष संदीप मांडवे,भास्कर मोरे,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव,भाळवणीचे युवा नेते  संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील,गोरख लिंगे आदी उपस्थित होते. […]

Uncategorized

शिवभोजन थाळी केंद्रांची तपासणी करा, नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न द्या

सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज नियोजन भवन येथे विभागांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, […]

Uncategorized

FRP चे तुकडे करण्याचा नीती आयोगाचा निर्णय राज्यात लागू करू नका

निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी संगनमताने FRP च्या तुकडीकरणाचा निर्णय घेतला असुन हा निर्णय शेतकर्यांसोबत घात करणारा ठरणार आहे.. कंट्रोल अ‍ॅक्ट 1966 अ नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊसाचे पैसे देणे कायद्याने बंधनकारक आहे हा निर्णय तत्कालीन सत्तेत असणाऱ्या युपीए सरकारनेच अस्तित्वात आणुन शेतकर्यांना न्याय दिला आहे.. आज राज्यात युपीएचेच […]

Uncategorized

बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रामदास खराडे यांची निवड

शेतकऱ्यांच्या,सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करीत आलेल्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रामदास खराडे यांची निवड करण्यात आली आहे.बळीराजा शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नितीन बागल आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर,महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री बोरा यांच्यासह बळीराजा शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  रामदास खराडे यांच्या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.        या निवडीनंतर […]

Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये गुड टच व बॅड टच जागृतीचे सेमिनार संपन्न

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित,फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये शालेय मुलांना चांगले स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल ऑनलाईन माहिती देण्यात आली. या सेमिनारचे आयोजन दोन बॅच मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सचिन लिगाडे यांनी ऑनलाईन माध्यमातून  व्हिडीओ दाखवून इयत्ता पहिली ते चौथीच्या  विद्यार्थ्यांना चांगले स्पर्श व वाईट स्पर्श […]

Uncategorized

भारतीय जनता युवा मोर्चाच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी रोहित उर्फ लाला पानकर यांची निवड

भारतीय जनता युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज भाजपाचे  जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकेश घोडके यांनी जाहीर केल्या असून या निवडीत पंढरपूर शहर अध्यक्षपदी रोहित उर्फ लाला पानकर यांची तर पंढरपूर तालुकाध्यक्षपदी सुनील भोसले यांची निवड करण्यात आली आहे.    गेल्या काही महिन्यापासून भारतीय जनता युवा मोर्चाचे […]

Uncategorized

पंढरपूर रोटरी क्लबच्या वतीने मंदिर परिसरात पोळी भाजी अन्नपूर्णा केंद्र सुरु

शुक्रवार दि. 27/ 8/ 2021  रोजी सकाळी रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने महाद्वार येथे अकरा रुद्र मारुती शेजारी, श्री कवठेकर काष्ट औषधी दुकाना समोर, ना नफा ना तोटा या तत्त्वावर  पोळी-भाजी वितरण केंद्र अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली. माननीय ह.भ .प. श्री मदन महाराज यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी मदन महाराज हरिदास यांनी […]

Uncategorized

गुंठेवारी प्लॉटची नोंद प्रमाणित करण्यासाठी मंडल अधिकारी मागत होता लाच

प्लॉट,जागा,शेती आदींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करताना हजारो रुपये मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी केली जाते.मात्र या दस्त नोंदणी नंतर विहित वेळेत संबंधित तलाठी,मंडलाधिकारी यांनी खातेउतारा अपडेट करून नोंद धरणे बंधनकारक आहे.मात्र सामान्य लोकांना या नोंदणीसाठी येणारे अनुभव अतिशय वाईट असून रीतसर कागदपत्रे सादर करूनही वारंवार हेलपाटे मारूनही अनेक तलाठी आणि मंडळ अधिकारी हे नागिरकांना वेठीस धरत […]

Uncategorized

गुटखा,सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या पुळूज येथील किराणा दुकानदारावर अन्न विभागाची कारवाई

दि. २३/०८/२०२१ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना प्राप्त गोपनीय माहिती नुसार पुळूज तालुका पंढरपुर येथील मानसी किराणा व जनरल स्टोअर्स या आस्थापनाची तपासणी केली असता या किराणा दुकानात विमल पान मसाला, व्ही १ तंबाखू, सुपरजेम पानमसाला, एस ९९ तंबाखू, आर एम डी पान मसाला, एम सुगंधित तंबाखू इत्यादींचा एकूण ४१४९०/- किमतीचा साठा अन्न पदार्थांच्या […]

Uncategorized

स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मयोगी महाविद्यालया मध्ये तीन दिवसीय “कर्मयोगी व्याख्यानमाला” संपन्न.

शेळवे : स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कर्मयोगी अभियांत्रिकी व पॉलीटेक्निक महाविद्यालय शेळवे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17 ते 19 ऑगस्ट दरम्यान आयोजित केलेली तीन दिवसीय आभासी “ कर्मयोगी व्याख्यानमाला” संपन्न झाली. यामध्ये प्रा. श्री लक्ष्मणराव ढोबळे, श्री विवेकजी घळसासी व ह.भ.प. श्री चैतन्य महाराज देगलूरकर या नामवंत वक्तांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिवर्षी अशा  व्याख्यानमालेचे आयोजन करणार […]