Uncategorized

पंढरपूर रोटरी क्लबच्या वतीने मंदिर परिसरात पोळी भाजी अन्नपूर्णा केंद्र सुरु

शुक्रवार दि. 27/ 8/ 2021  रोजी सकाळी रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने महाद्वार येथे अकरा रुद्र मारुती शेजारी, श्री कवठेकर काष्ट औषधी दुकाना समोर, ना नफा ना तोटा या तत्त्वावर  पोळी-भाजी वितरण केंद्र अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली. माननीय ह.भ .प. श्री मदन महाराज यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी मदन महाराज हरिदास यांनी रोटरीच्या या उपक्रमाचा गौरव करून म्हणाले की रोटरी सारख्या सुंदर नामा सोबत आपण अन्नही वितरण करत आहात त्याचा मला फार आनंद होत आहे सदर उपक्रम पंढरपुरात आलेल्या प्रत्येक यात्रेकरूंना लाभदायक होणार आहे व हा उपक्रम रोटरी क्लबने पंढरपूर सारख्या ठिकाणी सुरुवात करून रोटरीची वेगळीच ओळख करून दिलेली आहे.
रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष  रो.किशोर निकते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा प्रकल्प अविरत चालू ठेवला जाईल त्यासाठी मंदिर परिसरातील व्यापारी आणि मित्रपरिवार यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. सदर कार्यक्रमास माननीय वकील रो श्री एस आर जोशी, रो. जयंत हरिदास, रो श्री ओमकार सूर्यवंशी, रो. महेश निर्मळे, रो. मिलिंद वंजारी, रो. सचिन भिंगे पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मा श्री चंद्रकांत निकते ,श्री विष्णुकांत मंत्री, मा श्री लाड, श्री पतंगे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. पोळी भाजी प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरीयन महेश निर्मळे म्हणाले की पंढरपुरात ज्या ज्या ठिकाणी माफक दरात पोळीभाजीची आवश्यकता असेल तेथे तेथे प्रत्येक ठिकाणी लवकरच पोळी-भाजी वितरण केंद्र चालू करणार आहोत उदाहरणार्थ बस स्टँड एरिया, चौफाळा, सरगम चौक इत्यादी ठिकाणी अशी वितरण केंद्रे चालू करण्याचा मानस आहे. आभार प्रदर्शन प्रसंगी रोटरीयन जयंत हरिदास यांनी सदर सेवाभावी योजना नूतन अध्यक्ष किशोर निकते यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. अन्नपूर्णा योजना ही समाज उपयोगी योजना आहे व ती दीर्घकाळ चालू राहील यासाठी रोटरी प्रयत्नशील राहील असे प्रसंगोद्गार काढून उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रो.महेश निर्मळे यांनी भरपूर परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *