Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये गुड टच व बॅड टच जागृतीचे सेमिनार संपन्न

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित,फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये शालेय मुलांना चांगले स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल ऑनलाईन माहिती देण्यात आली. या सेमिनारचे आयोजन दोन बॅच मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सचिन लिगाडे यांनी ऑनलाईन माध्यमातून  व्हिडीओ दाखवून इयत्ता पहिली ते चौथीच्या  विद्यार्थ्यांना चांगले स्पर्श व वाईट स्पर्श कसे ओळखायचे हे सांगून मुलांच्या शंकांचे निरसन केले.  इयत्ता पाचवी ते बारावीच्या किशोरवयीन मुलींसाठी  मेंस्ट्रुअल अवेरनेस अँड हायजिनिंग  स्वच्छता आणि महत्व याबद्दलची  माहिती डॉ. अमृता लिगाडे यांनी दिली. त्या दिवसांमध्ये योग्य आहार व स्वच्छता याबद्दलही मार्गदर्शन केले व विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांचे योग्य निरसन केले.

   या  गुड टच, बॅड टच  जागृकता सेमिनारसाठी विद्यार्थी व पालक वर्गाने मोठ्या संख्येने  ऑनलाईन उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली कोठावळे  व सतीश देवमारे  यांनी तर  आभार प्रदर्शन शितल लिगाडे  व समाधान खांडेकर  यांनी केले. हा  सेमिनार यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील  यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *