Uncategorized

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी दिनेश माने-चौगुले यांची निवड

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी भाळवणी ता.पंढरपूर येथील दिनेश माने -चौगुले यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष विजयसिह देशमुख यांच्या हस्ते या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.हे पत्र प्रदान करतेवेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघ अध्यक्ष संदीप मांडवे,भास्कर मोरे,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव,भाळवणीचे युवा नेते  संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील,गोरख लिंगे आदी उपस्थित होते.
     राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विचाराला वाहून घेत करीत असलेल्या कार्याबद्दल हि निवड करण्यात आल्याचे यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिह देशमुख यांनी सांगितले तर सर्व समाज घटकांना सोबत घेत,सर्वाना समान संधी उपलब्ध करून देत राज्याच्या राजकरणात राष्ट्रवादी कॉग्रेसने एक आदर्श ठेवला आहे,पक्षाचे ध्येय धोरणे आणि विचार नूतन तालुका उपाध्यक्ष दिनेश माने चौगुले हे पार पाडतील असा विश्वास यावेळी मतदार संघ अध्यक्ष संदीप मांडवे यांनी व्यक्त केला.
     राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुक्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिनेश माने-चौगुले यांचे डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन चेअरमन अभिजित पाटील,राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा अनिता पवार आदींनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    या निवडीनंतर नूतन तालुकाध्यक्ष दिनेश माने-चौगुले यांनी आभार व्यक्त करत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आणखी नेटाने संघर्ष करू अशी ग्वाही दिली.यावेळी तिसऱ्या आघाडीचे संस्थापक गोरख लिंगे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील,गोपाळ चौगुले,नवनाथ पाटील,रविराज शिंगटे,दुर्योधन लोखंडे आदी उपस्थित होते.                       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *