Uncategorized

सासरा करत होता सुनेला ब्लॅकमेल,अंघोळ करताना गुपचूप काढला होता व्हडिओ

  पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सदर गुन्ह्यातील पिडीता राहणेस असुन मागील दोन आठवड्यापुर्वी दुपारी 12/30 वा.चे सुमारास पिडीता हि एकटी घरी असताना पिडीताचे सासरे यांनी पिडीता हिचे अंगावर हात टाकुन तिचेशी बऴजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेऴी पिडीता हि जोरात ओरडल्यानंतर तिला त्यांनी सोडुन दिले होते. घडलेला सदर प्रकार हा पिडीता हीने त्याचे पती […]

Uncategorized

परिचारक विरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार ?

पंढरपूर नगर पालिकेच्या परिचारक सर्मथक आघाडीच्या विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना भोसले आणि सर्वच नगरसेवकांचा कार्यकाळ दिनांक ३० डिसेंबर रोजी संपुष्ठात येत आहे.वास्तविक पाहता निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा पंचवार्षिक कार्यकारी सदस्यांचा कार्यकाळ संपुष्ठात येण्यापूर्वी किमान १५ दिवस निवडणूक प्रकिया पूर्ण केली जाते.परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गास देण्यात आलेले आरक्षण मार्च २०२१ मध्ये […]

Uncategorized

प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार २८ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक मिञ प्रणव परिचारक यांच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सामाजिक कृतज्ञापर भव्य अशा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रक्तदान शिबीराचे आयोजक पांडुरंग परिवार पंढरपूर मंगळवेढा युवक आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.  प्रणव परिचारक मित्र परिवार यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरा प्रमाणेच […]

Uncategorized

कामगारांच्या घरातील बालकांच्या चेहऱ्यावर ख्रिसमसच्या निमित्ताने फुलले हास्य कमळ

मेरी ख्रिसमस च्या निमित्ताने आज पंढरपुरातील कामगारांच्या वसाहतीत जाऊन युवती सेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे कष्टकरी कामगारांच्या घरातील या लहान लहान बालकांच्या चेहऱ्यावर हास्यकमल फुलले.देशभरात ख्रिसमस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असताना आज पंढरपुरात युवती सेनेच्या तालुका अध्यक्ष ॲड.पूनम अभंगराव ,गायत्री गायकवाड ,सारिका जाधव यांच्या वतीने पंढरपूर परिसरात रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या व समाजाने दुर्लक्षित केलेल्या […]

Uncategorized

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक 23 डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून काम करणार

पुणे जिल्ह्यात वाबळेवाडी येथे आंतराष्ट्रीय शाळा उभी करणारे शिक्षक दत्तात्रय वारे यांना अनियमिततेचा ठपका ठेवून पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे. नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या या कारवाईच्या निषेधार्थ दि. २३ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सुनिल कोरे सर व महिला आघाडीच्या […]

Uncategorized

दत्त जयंती निमित्त जयदादा मित्रमंडळाकडून भाविकांना फराळ वाटप

पंढरपूर शहरात विविध ठिकाणी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असून शहरातील दत्त घाट दत्त मंदिर,विप्र दत्त मंदिर यासह विविध दत्त मंदिराच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.     दत्त जयंतीचे औचित्य साधत आज पंढरपुरात जयदादा मित्रमंडळाकडून भाविकांना मोफत फराळ वाटप करण्यात आले.यावेळी समाधान काळे, प्रथमेश शिंदे, परमेश्वर कांबळे, किशोर कदम, आदित्य पारचंडे, दिनेश […]

Uncategorized

युवती सेनेच्या पंढरपूर तालुका प्रमुखपदी ॲड.पूनम अभंगराव तर उपप्रमुखपदी सारिका जाधव यांची निवड

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेनेचे मागर्दशक आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना  सचिव वरुण सरदेसाई,ॲडवोकेट दुर्गा ताई भोसले यांच्या सुचनेप्रमाणे युवा सेना व युवती सेनेच्या माध्यमातून तरुणाईशी संबंधित अनेक प्रश्नांची सोडवणूक कऱण्यात राज्यात युवती सेना महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.पंढरपूर तालुक्यात आता युवती सेना महत्वपूर्ण भूमिका बजावण्यास सज्ज झाली असून युवती सेनेच्या पंढरपूर तालुका प्रमुखपदी […]

Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय रोलर स्केटिंगमध्ये मारली बाजी

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल  अॅन्ड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय रोलर स्केटिंग मध्ये बाजी मारली. आपले शरीर लवचिक राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात त्यापैकीच एक खेळ म्हणजे स्केटिंग. मुलांमध्ये अगदी लहानपणापासून स्केटिंग चे आकर्षण असते .पायाला चाके लावून भन्नाट वेगाने पुढे जाणे असे वाटते पण त्याचेही एक शास्त्र व नियम आहे स्केटिंग […]

Uncategorized

मनसेला मोठा धक्का !

मनसेच्या डॅशिंग, फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. राज ठाकरे यांना पत्र लिहून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी कळवलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आज त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.   गेल्या अनेक दिवसांपासून त्या […]

Uncategorized

आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत स्वेरीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तथा गव्हर्मेंट ऑफ गोवा, विज्ञानभारती आणि राष्ट्रीय ध्रुवीय समुद्री अनुसंधान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा मध्ये ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टीवल २०२१’ आयोजित करण्यात आला होता. या फेस्टीवलला स्वेरीतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून स्वेरीतील संशोधनाला आणखी गती प्राप्त करून दिली आहे.             या उपक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील […]