Uncategorized

कामगारांच्या घरातील बालकांच्या चेहऱ्यावर ख्रिसमसच्या निमित्ताने फुलले हास्य कमळ

मेरी ख्रिसमस च्या निमित्ताने आज पंढरपुरातील कामगारांच्या वसाहतीत जाऊन युवती सेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे कष्टकरी कामगारांच्या घरातील या लहान लहान बालकांच्या चेहऱ्यावर हास्यकमल फुलले.देशभरात ख्रिसमस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असताना आज पंढरपुरात युवती सेनेच्या तालुका अध्यक्ष ॲड.पूनम अभंगराव ,गायत्री गायकवाड ,सारिका जाधव यांच्या वतीने पंढरपूर परिसरात रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या व समाजाने दुर्लक्षित केलेल्या लहान मुलांना खाऊ वाटप तसेच थंडीपासून संरक्षण होण्यासाठी लहान मुलांना कानटोपी तसेच लोशन क्रीम अशा भेटवस्तू देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.     

  या उपक्रमा बाबत माहिती देताना युवती सेनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट पूनम अभंगराव म्हणाल्या कि, हे मुले माझ्या भारत देशाचे भविष्य आहे…जर हे भविष्य उज्वल हवे असेल तर यांना मदत झालीच पाहीजे. जिवनातील जे काही आनंदाचे क्षण असतात त्यातील आज एक खुपच आनंदाचा क्षण.या लहान मुलांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या स्मितहास्य पाहून मनाला समाधान वाटले.      

 यावेळी  समाजसेवक मुजम्मील कमलीवाले,सौ.दुर्गा माने,स्वाती माने,सोनाली माने,राजश्री बाबर मॅडम,सवीता दुधभाते मॅडम,पूजा करकमकर, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *