Uncategorized

युवती सेनेच्या पंढरपूर तालुका प्रमुखपदी ॲड.पूनम अभंगराव तर उपप्रमुखपदी सारिका जाधव यांची निवड

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेनेचे मागर्दशक आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना  सचिव वरुण सरदेसाई,ॲडवोकेट दुर्गा ताई भोसले यांच्या सुचनेप्रमाणे युवा सेना व युवती सेनेच्या माध्यमातून तरुणाईशी संबंधित अनेक प्रश्नांची सोडवणूक कऱण्यात राज्यात युवती सेना महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.पंढरपूर तालुक्यात आता युवती सेना महत्वपूर्ण भूमिका बजावण्यास सज्ज झाली असून युवती सेनेच्या पंढरपूर तालुका प्रमुखपदी ॲड.पूनम साईनाथ अभंगराव तर उपप्रमुखपदी सारिका जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
    या निवडी नंतर ॲड.पूनम साईनाथ अभंगराव यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून या निवडी बाबत बोलताना ॲड.पूनम अभंगराव यांनी सर्वसामान्य वर्गाच्या समस्या आणि सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून पाठपुरावा करणे गरजेचे असलेल्या सर्व प्रश्नांसाठी  युवा सेना आणि युवती सेना अतिशय मोलाची भूमिका बजावत आहे.पंढरपूर शहरातील जास्तीत जास्त युवतींचे मजूबत संघटन करण्यासाठी युवती सेनेच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि जेष्ठ यांचे मोलाचे मार्गदर्शन घेऊन परिश्रम घेऊ अशी ग्वाही दिली.यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या कि  माझे  वडील साईनाथ  भाऊ अभंगराव शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून अतिशय यशस्वी काम पाहिले आहे.शिवसेनेच्या माध्यमातून मागील 30 ते 40  वर्ष  त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी,गोरगरिबासाठी केलेला संघर्ष मी जवळून पहिला आहे.  मी या ढाण्या वाघाची मुलगी आहे.गोरगरीब,सर्वसामान्य युवती मुलींवर जर कुठे अन्याय होताना दिसला तर मी लढा देणार आहे.माझे चुलते शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर  अभंगराव यांचेही मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.माझी युवती सेनेच्या  तालुका प्रमुखपदी निवड करून टाकलेला विश्वास मी नक्की सार्थ करील.
   युवती सेनेच्या तालुका प्रमुखपदी ॲड.पूनम अभंगराव तर उपप्रमुखपदी सारिका जाधव यांची निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे शहर प्रसिद्धी प्रमुख लंकेश बुराडे,शहर उपप्रमुख बंदपट्टे आणि कामगार सेना प्रमुख विनय वानरे यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *