पुणे जिल्ह्यात वाबळेवाडी येथे आंतराष्ट्रीय शाळा उभी करणारे शिक्षक दत्तात्रय वारे यांना अनियमिततेचा ठपका ठेवून पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे. नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या या कारवाईच्या निषेधार्थ दि. २३ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सुनिल कोरे सर व महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ देवकी कलढोणे मॕडम यांनी दिली .
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी शाळेने एक वेगळा इतिहास निर्माण केला आहे. अवघ्या ३४ शाळेची पटसंख्या ९वर्षात ५३१पर्यंत नेऊन ती आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून लौकिकपात्र ठरली आहे.शिवाय महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रेरणास्थान झाली असून एक लाखापेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षण प्रेमींनी या शाळेला भेट दिली आहे . या शाळेतील शिक्षक श्री. दत्तात्रय वारे यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचे कौतुक केले आहे.
मात्र स्थानिक राजकारणाच्या चिखलातून अशा होतकरु शिक्षकांवर अत्यंत हास्यास्पद आरोप करुन कामात अनियमितता असा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे.
‘ तुम्ही जर नाविण्यपूर्ण, वेगळे काम कराल, तुमचा दत्तात्रय वारे होईल ‘ अ म्हण आज शिक्षण व्यवस्थेत रुढ होवू पहात आहे .दत्तात्रय वारे हे आज केवळ शिक्षक उरले नसून राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशीलतेचा चेहरा बनले आहेत. त्यांनाच निलंबित करुन अपमानित केल्यामुळे शिक्षकांत निराशेचे वातावरण पसरले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मनांमध्ये देखील या संदर्भात मोठी अस्वस्थता दिसून येत आहे . या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी व या संपूर्ण प्रकाराची योग्य ती चौकशी होवून न्याय मिळावा या मागणीसाठी गुरुवार दि. 23 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक बांधवांनी दिवसभर काळ्या फिती लावून शैक्षणिक कार्य करावे असे आवाहन पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सुनिल कोरे,सरचिटणीस पोपट कापसे. कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे जिल्हा उपाध्यक्ष सचिन लादे.जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे नेते किशोर गोडसे.उमेश तारापूरकर शिवाजी व्यवहारे.पु.प्रा.शि.सह.पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ खपाले व्हा,चेअरमन संतोष थोरात.पं.ता.प्रा,शि.सह.पतसंस्थेचे चेअरमन बलभिम जाधव मा.चेअरमन बालाजी शिंदे.अशोक कांबळे.आवेश करकमकर.संचालक दत्तात्रय हेंबाडे विष्णू नरळे संतोष कांबळे रावण मदने दत्तात्रय खंदारे हेमंत माने स्नेहल आम्ले जिल्हा सल्लागार अनिल बंडगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आण्णासाहेब रायजादे.कोषाध्यक्ष संतोष कापसे.उपाध्यक्ष सुनिल अडगळे गोविंद कुलकर्णी नानासाहेब नरळे सुभाष अधटराव महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ.देवकी कलढोणे सरचिटणीस सौ.अर्चना कोळी जिल्हा उपाध्यक्षा सौ.सुरेखा इंगळे जिल्हा कार्यालयीन चिटणीस सौ चंद्रकला खंदारे. कार्याध्यक्षा सौ.अनिता माने कोषाध्यक्षा सौ.सुवर्णा टकले उपाध्यक्षा सौ मंजिरी देशपांडे सौ सुप्रिया आम्ले यांनी केले आहे .
