ताज्याघडामोडी

सातत्याने तक्रार येणा-या हाॅस्पिटलवर यापुढे गुन्हे दाखल करण्यात येणार

जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने आता पर्यंत २२ हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्णांच्या बिलांचे ऑडिट करून तब्बल १७ कोटी ३४ लाख रुपये कमी केले आहेत. यापुढे सातत्याने तक्रार येणा-या हाॅस्पिटलवर यापुढे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळात रुग्णालयांनी आकारलेल्या आवास्तव बिलांच्याविरोधात […]

ताज्याघडामोडी

कोरोनावर मात करुन मुलगा घरी आला, रुग्णालयातून आईला फोन, तुमचा मुलगा वारला!

सातारा: कोरोना काळात आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभाराची अनेक प्रकरण समोर आली आहेत. सातारा जिल्हयात फलटण येथील 20 वर्षीय युवकाला कोरोनामुळे जिवंतपणी मृत घोषित करण्याचा भोगंळ कारभार घडला आहे. आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराची सातारा जिल्ह्यात चर्चा आहे. तर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा प्रकार सातारा जिल्हयातील फलटण […]

ताज्याघडामोडी

खासगी रुग्णालयांना दणका, कोविड उपचारांसाठी असे असतील निश्चित दर

मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका भारताला बसला. त्यातही महाराष्ट्रात याचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग अधिक पाहायला मिळाला. ज्यामुळे अनेकांचे हाल झाले. पण आता कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक प्रकार! बिलाच्या वसुलीपोटी रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र केलं जप्त

कोरोना महामारीच्या संकटात काही खासगी रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटना ताज्या असतानाच बुलडाण्याच्या खामगावात संतापजनक घटना समोर आली आहे. बिलमध्ये 11 हजार रुपये कमी पडत होते म्हणून रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोपर्यंत 11 हजार रुपये किंवा मंगळसूत्र देत नाही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड; गुन्हा दाखल

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टरांनाही मारहाण केली. नगरमधील तारकपूरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज तानाजी गडाख आणि रोहन बाबासाहेब पवार (दोघेही रा. टाकळीकाझी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. राहुल अरुण ठोकळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक! मृत्यूनंतरही कोरोनाग्रस्तावर 3 दिवस उपचार, पैसे उकळण्यासाठी डॉक्टरांचा प्रताप

नांदेड, 19 मे: नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयानं कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे उकळण्यासाठी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही 3 दिवस उपचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित रुग्णालयानं कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर विविध औषध आणि उपचाराच्या नावाखाली पीडित नातेवाईकांचे लाखो रुपये उकळले आहेत. त्याचबरोबर रुग्णावर काय उपचार केला, याचा तपशील मागितला असता आणखी 40 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

3 लाखांचे बिल भरले नाही म्हणून रुग्णाला ठेवले हॉस्पिटलमध्ये डांबून, तब्बल 12 तासानंतर सुटका

नाशिक, 15 मे : बिल भरले नाही म्हणून नाशिकमध्ये एका खासगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णाला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित रुग्णाच्या मुलाने मदत मागितल्यानंतर तब्बल 12 तासांनी या रुग्णाची हॉस्पिटलमधून रुग्णाची सुटका करण्यात आली. घडलेली हकीकत अशी की, नाशिकच्या गंगापूर रोडवरील मेडिसिटी या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या श्रीधर दिघोळे नामक रुग्णाच्या मुलाचा फोन आला […]

ताज्याघडामोडी

देश पुन्हा हादरला! ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने 22 हून अधिक रुग्णांचा तडफडून मृत्यू

आंध्रप्रदेश, 10 मे : आंध्रप्रदेशातील एका रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे देश पुन्हा हादरला आहे. आंध्रप्रदेशच्या तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद  झाल्याने तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानेही ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदात वर्तविण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांचा राडा; शिवीगाळ करत डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण

इंदापूर, 09 मे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका कोविड सेंटरमध्ये घुसून काही तरुणांनी तुफान राडा केला आहे. आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाहीत, असा आरोप करत दोन तरुणांनी एका डॉक्टरासह दोन परिचारकांना मारहाण केली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

ताज्याघडामोडी

अखेर अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलचा परवाना रद्द 

अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाची १४ तास अडवणूक पंढरपुरात ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पंढरपुरातील एका ७५ वर्षीय कोरोना बाधित वृद्ध महिलेस सांगली येथील अपेक्स केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.पाच दिवस तेथे ऍडमिट असलेल्या वृद्धेस सोबत असलेल्या नातवास व सुनेस देखील भेटू दिले नाही.ती वृद्ध महिला ३० एप्रिल रोजी मरण पावली असता अडीच लाख रुपये भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात […]