ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट खाडे याची  नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन हेच या यशामागील गमक आहे असे प्रतिपादन प्रशाले च्या प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई यांनी सांगितले. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पियुष च्या  यशाबद्दल त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पियुषच्या हे यश इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी असून यामुळे कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेचा शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तेसाठीचे नाव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *