दिनांक 12/01/2026 रोजी कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माऊली फार्म हाऊस, भंडीशेगाव येथे शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी दास, तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी आदरणीय श्री. राजकुमार कोथमिरे साहेब यांच्या फार्म हाऊसला भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंबा, चिंच, चिकू, गुलाब इत्यादी विविध झाडे तसेच त्यांचे निवासस्थान पाहिले. फार्म हाऊसचा परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर व निसर्गरम्य होता. विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त वनभोजनाचा आनंद घेतला. विविध खेळ, नृत्य यामध्ये सहभागी होत त्यांनी आनंद व्यक्त केला. या भेटीत विद्यार्थ्यांना विविध वृक्षांची माहिती मिळाली तसेच शेतीविषयक ज्ञान व पारंपरिक जीवनशैलीची ओळख झाली. आदरणीय श्री. राजकुमार कोथमिरे साहेब यांनी विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी फार्म हाऊस उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी दास यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.






